अफ्रिका खंडातील नामिबिया या देशातून चित्ते आणून ते भारतात वसवण्याच्या केंद्र सरकारच्या पहिल्या प्रयोगात अनेक अडचणी आल्या आहेत. त्यानंतरही याचा याचा दुसरा टप्पा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यानुसार, पुन्हा एकदा अफ्रिकेतून भारतात चित्त्यांची खेप येणार आहे. पर्यावर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. पर्यावरण मंत्रालयात वन विभागाचे अतिरिक्त महानिदेशक एस पी यादव यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत या योजनेबाबत माहिती दिली. यादव हे राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाचे प्रमुखही आहेत. त्यांनी सांगितलं की, “चित्त्यांची पुढची बॅच दक्षिण अफ्रिकेतून आयात केली जाणार आहे. यावेळी आलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्यात ठेवण्यात येईल.
या वर्षाच्या शेवटी हे चित्ते भारतात दाखल होतील. ‘या’ अभयारण्यात होणार पुनर्वसन चित्ता अॅक्शन प्लॅनमध्ये उल्लेख केल्याप्रमाणं कुनो अभयारण्यात २० चित्ते राहतील एवढी क्षमता आहे. सध्या या ठिकाणी चित्त्याच्या एका बछड्यासह १५ चित्ते आहेत. देशात आम्ही चित्त्यांची दुसरी खेप आणू तेव्हा त्यांना देशातील इतर ठिकाणी ठेवण्यात येईल. मध्य प्रदेशात आम्ही दोन ठिकाणं चित्त्यांच्या अधिवासासाठी तयार करत आहोत. यांपैकी एक गांधी सागर अभयारण्य तर दुसरं नौरादेही अभयारण्य आहे.
गांधी सागर अभयारण्यात वेगानं तयारी सुरु असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत ही तयारी पूर्ण होईल. आधिवास पूर्णपणे तयार झाल्यानंतर आम्ही एकदा या साईटला भेट देऊ त्यानंतर चित्त्यांना आणण्याचा निर्णय घेऊ, असंही यादव यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांचे मृत्युसत्र सुरूच आहे. येथील धात्री नावाच्या मादी चित्त्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत येथील नऊ चित्ते मरण पावले आहेत. त्यापैकी तीन बछडे होते.
हे ही वाचा:
मराठवाड्याच्या दुष्काळ परिस्थितीवर जयंत पाटील म्हणाले …
सूर्यवंशी’ नंतर पुन्हा रोहित शेट्टीसोबत करणार काम