spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

Chocolate Day : व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने बनवा घरच्या-घरी चॉकोलेट; जाणून घ्या रेसिपी

Chocolate Day : चॉकलेट डे हा दिवस ९ फेब्रुवारीला Valentine Week च्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी, प्रेमी-प्रेमिका किंवा मित्र-मैत्रिणी एकमेकांना चॉकलेट गिफ्ट देऊन आपली भावना व्यक्त करतात. त्याचबरोबर लहान मुलं असोत वा मोठी माणसं, चॉकलेट तर सर्वांनाच आवडतं. चॉकलेट न आवडणारी व्यक्ती तुम्हाला मोजक्याच मिळतील. फक्त खायला नव्हे तर इतरांना गिफ्ट देण्यासाठीही चॉकलेटलाच सर्वाधिक पसंती असते. पण चॉकलेट बाहेरून न घेता तुम्ही तुमच्या पसंतीचे चॉकलेट घरच्या घरी देखील बनवू शकता. तर नक्की जाणून घ्या याची रेसिपी.

  • घरच्या घरी चॉकलेट बनवण्याचे साहित्य :
  • २०० ग्रॅम डार्क चॉकलेट
  • १०० ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट
  • आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता
  • वाटीभर कंडेन्स मिल्क
  • एक चमचा तूप
  • हार्ट शेप साचा

घरच्या घरी चॉकलेट बनवण्याची कृती :
सर्वप्रथम, चॉकलेट तुकडे करा आणि एका स्टीलच्या वाडग्यात ठेवा. चॉकलेट वितळवण्यासाठी डबल बॉयलरची पद्धत वापरा. एका मोठ्या वाडग्यात पाणी घेऊन ते पाणी गरम करून घ्या. त्यानंतर एका छोट्या वाडग्यात चॉकलेट घेऊन त्या गरम पाण्याच्या वाफेवर चॉकलेट वितळवून घ्या. चॉकलेट वितळल्यानंतर तुमच्या आवडीच्या आकाराच्या साच्यात खास करून हार्ट शेपच्या साच्यात एक एक चमचा वितळलेले चॉकलेट घाला त्या काजू, बदाम, पिस्ता घालून ते चॉकलेट मोल्ड्स १० ते १५ मिनिट फ्रिज करा. तयार चॉकलेट, चॉकलेट पेपरमध्ये रॅप करून सुंदरअशा बॉक्समध्ये किंवा त्या चॉकलेटचा बुके तयार करून ते तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेट म्हणून देऊ शकता.

हे ही वाचा :

संरक्षण उत्पादन क्षेत्रात पॉलिसी तयार करणारे ‘महाराष्ट्र’ पहिले राज्य!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

 

Latest Posts

Don't Miss