spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

ख्रिसमसच्या आनंदावर आलं विरजण, जर्मनीत बाजारातील लोकांना कार खाली चिरडलं, नेमकं काय आहे प्रकरण?

जर्मनीमधील पूर्व भागातील शहर मॅगडेबर्ग येथे दहशतवादी हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे सौदी अरबच्या एक माथेफिरूने जर्मनीतील मॅगडेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये कार घुसवून लोकांना चिरडले. त्यात ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर ८० पेक्षा अधिक नागरिक हे गंभीर जखमी झाले आहे. त्यातील अनेकांची स्थिती चिंताजनक असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला आहे का, याचा पोलीस आणि तपास यंत्रणा चौकशी करत आहे. ख्रिसमसची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. आपल्यावर असा हल्ला होईल, याची पुसटशी कल्पना पण येथील नागरिकांना नव्हती. जर्मनीने सीरीया आणि आखाती देशातील अनेक निर्वासितांना आश्रय दिला आहे, त्याचे त्यांना परिणाम भोगावे लागत असल्याचा आरोप युरोपमधील स्थानिकांनी केला आहे.

पोलिसांनी सांगितले आहे की शुक्रवारी संघ्याकाळी ७ वाजता हा हल्या करण्यात आला. जर्मनीतील मॅगडेबर्ग येथील ख्रिसमस बाजारात अनेक जण नाताळाच्या खरेदीसाठी आले होते. त्यावेळी रत्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एक भरधाव कार या लोकांना चिरडत पुढे गेली. त्यावेळी एकच आरडाओरड झाली. नागरिक जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळाले. बाजारातील पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. हा दहशतवादी हल्ला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर बाजार बंद करण्यात आला.

कार चावलणारी व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचे नाव तालेब असे आहे. तो सौदी अरबचा नागरिक आहे. तो ५० वर्षाचा आहे. तो मॅगडेबर्गपासून जवळपास ४० किलोमीटर दक्षिणेकडील बर्नबर्ग या ठिकाणी वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून काम करतो. डॉक्टर तालेब हा २००६ मध्ये जर्मनीत आला होता . २०१६ मध्ये त्याला निर्वासिताचा दर्जा मिळाला होता. आरोपी हा सॅक्सोनी-एनहाल्ट येथील रहिवाशी आहे. ज्या कारने हा अपघात घडवण्यात आला. ती त्याने म्यूनिख येथून भाडे तत्वावर खरेदी केली होती. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी त्याला तात्काळ कारमधून खाली ओढले. त्याच्यावर पोलीस बंदूक रोखून असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. दरम्यान सौदी अरबने या घटनेची निंदा केली आहे. मयतांच्या कुटुंबियाच्या दु:खात आपला देश सहभागी असल्याचे निवेदन या देशाने दिले आहे. अशा हल्याचा तीव्र निषेध सौदीने केला आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss