Wednesday, November 29, 2023

Latest Posts

सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळणार

यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा केंद्र सरकार सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.

यंदा दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा केंद्र सरकार सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. या वृत्ताबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाकडून ईमेलद्वारे माहिती मागवण्यात असता, त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढलेल्या असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

दरात कपात करण्यात आली
केंद्रीय मंत्रिमंडळाने 4 ऑक्टोबर रोजी 9.5 कोटी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 100 रुपये अनुदान मंजूर केले होते. याआधी सप्टेंबरमध्ये सरकारने देशभरातील सर्व सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी गॅस सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी मंजूर केली होती. सध्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी एका एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 603 रुपये मोजतात, तर इतर सरासरी ग्राहकांना एका एलपीजी गॅस सिलेंडर 903 रुपये द्यावे लागतात .

 

 

२०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरूवात
गरीब कुटुंबातील गृहिणींनी चूलीवर जेवण बनवणं टाळण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. केंद्र सरकारने अलीकडेच 2024-26 या वर्षासाठी 7.5 कोटी रुपये आणि उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनसाठी अतिरिक्त 1650 कोटी रुपये जारी केले आहेत.

एलपीजी सिलेंडरच्या विक्रीत वाढ
अलिकडे सरकारने दरात वाढ केल्याने एलपीजी गॅल सिलेंडरच्या विक्रीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि सामान्यांसाठी 29 ऑगस्ट 2023 रोजी LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त केले होते. केंद्र सरकारच्या या दिलासादायक निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात दररोज रिफिल होणाऱ्या एलपीजी सिलेंडरची सरासरी संख्या 11 लाखांच्या पुढे गेली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एलपीजी आणखी 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आला. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये एलपीजी गॅसची मागणी वाढली असल्याचे दिसून आली आहे. एलपीजी सिलेंडर रिफिलच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते.

 

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

 

 

 

Latest Posts

Don't Miss