spot_img
Tuesday, February 18, 2025

Latest Posts

Delhi Election Polling: दिल्ली विधानसभा निवडणूकीची धामधूम; अवघ्या काही तासांवर निवडणूक

दिल्ली निवडणूक २०२५ (Delhi Election) अगदी जवळ आली आहे.मतदानाच्या दिवशी किना आधी मतदार सेवा पोर्टल, मतदार हेल्पलाइन अँप (Voting helpline App) वापरून किंवा तुमच्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (BLO) संपर्क साधून तुमच्या मतदान केंद्राच्या तपशीलांची आगाऊ खात्री करा.

दिल्ली निवडणूक २०२५ (Delhi Election) अगदी जवळ आली आहे.मतदानाच्या दिवशी किना आधी मतदार सेवा पोर्टल, मतदार हेल्पलाइन अँप (Voting helpline App) वापरून किंवा तुमच्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (BLO) संपर्क साधून तुमच्या मतदान केंद्राच्या तपशीलांची आगाऊ खात्री करा. ५ फेब्रुवारी रोजी कुठे मतदान करायचे हे जर तुम्हाला एका क्लीकवर घरबसल्या समजणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फक्त एक दिवस उरला असताना, मतदारांना त्यांचे मतदान केंद्र निश्चित करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील ७० मतदारसंघांमध्ये ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. राजधानीत एकूण १.५५ कोटींहून अधिक मतदारांसाठी १३,०३३ मतदान केंद्रे उभारली जातील.

तुमचे मतदान केंद्र कसे तपासायचे
जर तुम्हाला तुमच्या मतदान केंद्राबद्दल खात्री नसेल, तर खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:

अधिकृत मतदार सेवा पोर्टलला भेट द्या: https://voters.eci.gov.in/

पृष्ठाच्या उजव्या बाजूला, “तुमचे मतदान केंद्र आणि अधिकारी जाणून घ्या” या लिंकवर क्लिक करा.

लिंकवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल.

तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक आणि प्रदर्शित होणारा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

“शोधा” वर क्लिक करा आणि तुमच्या मतदान केंद्राची माहिती स्क्रीनवर दिसेल.

तुमचे मतदान केंद्र शोधण्यासाठी गुगल प्ले (Google Play) किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर (App Store) वरून “मतदार हेल्पलाइन” अ‍ॅप डाउनलोड करा. नोंदणी केल्यानंतर, लॉग इन करा आणि तुमचे मतदान केंद्र तपशील मिळविण्यासाठी “मतदार यादीत शोधा” वर क्लिक करा. मतदान केंद्राच्या माहितीसाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या १९५० या हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता. तुमच्या बीएलओशी संपर्क साधू शकता. आवश्यक तपशील मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) शी थेट संपर्क साधू शकता.

हे ही वाचा : 

बॉलीवूड अभिनेत्री Priyanka Chopra भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss