spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

Delhi Election Result 2025 : दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो…निवडणुकांच्या निकालावर काय म्हणाले Rohit Pawar?

१५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे.

Delhi Election Result 2025 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता बहुप्रतीक्षित असलेल्या दिल्लीच्या रणसंग्रामात भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. सुरुवातीचे कौल समोर येत आहे.एकीकडे मतमोजणी सुरू आहे. या विधानसभेत काँग्रेस किती जागा मिळवू शकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच, आतापर्यंतचे निकाल पाहिले तर भाजप आघाडीवर दिसून येत आहे तर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर आतिशी या विजयी झाल्या आहेत. निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून पोस्ट करत भाजपचे अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार? 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी.

हे ही वाचा :

Latest Posts

Don't Miss