Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Delhi पुन्हा हादरली! एकतर्फी प्रेमातून मुलाने केले मुलीवर वार…

एकतर्फी प्रेमाचा परिणाम हा खूप जास्त भयंकर असतो असं म्हटलं जातं. एकतर्फी प्रेमाची अशीच एक धक्कादायक घटना दिल्लीतील बेगमपूरमधून समोर आली आहे.

सध्या अनेक गुन्हेगारीच्या गोष्टी समोर येत आहेत. राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील साक्षी हत्याकांडाची (Sakshi Murder Case) घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमाचा परिणाम हा खूप जास्त भयंकर असतो असं म्हटलं जातं. एकतर्फी प्रेमाची अशीच एक धक्कादायक घटना दिल्लीतील बेगमपूरमधून समोर आली आहे.

दिल्लीतील बेगमपूर येथील परिसरात राहणाऱ्या तरुणीला एकतर्फी प्रेमाची किंमत चुकवावी लागली. एका सनकी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा कापला. यानंतर त्यानं स्वत: फाशी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेगमपूर येथे राहणाऱ्या मुलाने अनाठायी प्रेमातून मुलीवर वार करून आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तरीही मुलाला वाचवता आले नाही. पोलिसांनी सांगितले की, मुलगा आणि मुलगी दोघेही एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होते.मुलाचे मुलीवर प्रेम होते, मात्र मुलीला तो मुलगा आवडत नव्हता. त्यामुळे मुलाने मुलीवर चाकूने वार केले.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवार,दिनांक २ जून रोजी दुपारी ऑफिसमध्ये मुलाने मुलीवर चाकूहल्ला केला. त्यानंतर कार्यालयात गोंधळ उडाला आणि घाईघाईत मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मुलाने ऑफिसमध्ये येऊन आत्महत्या केली आणि त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या मुलाचे नाव अमित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच यापूर्वी बिजनौरमधून अशी घटना समोर आली होती. पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील नजीबाबाद भागात एका व्यक्तीचे एका तरुणीवर प्रेम होते, मात्र तरुणीचे दुसऱ्याच प्रेमात होते. अशा स्थितीत तो व्यक्ती मुलीची छेड काढत असे. ज्याची तक्रार तरुणीने तिच्या प्रियकराकडे केली. त्यामुळे मुलीच्या प्रियकराने मित्रांसह मुलाची हत्या केली.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss