Friday, April 19, 2024

Latest Posts

बारावीनंतर नाही तर दहावीनंतर करता येतील हे Diploma; जाणून घ्या सविस्तर

नुकताच महाराष्ट्रात दहावीचा निकाल लागला आहे. या वर्षी राज्यात दहावीचा निकाल ९३.८३ टक्क्यांनी लागला असून सर्व विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत . यावर्षीदेखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विद्यार्थी उत्तमरीत्या उत्तीर्ण झाल्यामुळे पालक देखील खुश आहेत.

नुकताच महाराष्ट्रात दहावीचा निकाल लागला आहे. या वर्षी राज्यात दहावीचा निकाल ९३.८३ टक्क्यांनी लागला असून सर्व विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत . यावर्षीदेखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विद्यार्थी उत्तमरीत्या उत्तीर्ण झाल्यामुळे पालक देखील खुश आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर मुलांना एकच चिंता लागून राहते ती म्हणजे पुढील अभ्यासक्रमाबाबत. पुढील शिक्षण कोणत्या विषयात घ्यायचं या विचारात मुले गोंधळून जातात. काही विद्यार्थाना अभ्यासक्रमाबाबत पुरेशी कल्पना देखील नसते. बहुतेकांना डिप्लोमाविषयी माहिती नसते. काहींना वाटते फक्त बारावीनंतर डिप्लोमा कोर्सेस करता येतात. मात्र तसे अजिबात नाही. दहावीच्या परीक्षेनंतर देखील काही असे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन करू शकतात. चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया.

डिप्लोमा इन फाईन आर्टस् ( Diploma in fine arts)

दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला फाईन आर्टस् या विषयात डिप्लोमा करता येतो. या डिप्लोमा कोर्सचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो. हा डिप्लोमा कोर्स केल्याने तुमच्यातल्या कलेला वाव मिळेल. तुम्हला जर अनिमेशन (Animation), ग्राफिक डिझायनिंग (Graphic designing), फॅशन डिझायनिंग (Fashion Designing) या विषयांची रुची असेल तर तुम्ही हा डिप्लोमा कोर्स करू शकता.

डिप्लोमा इन स्टेनोग्राफर (Diploma in stenographer)

दहावीच्या परीक्षेनंतर तुम्ही स्टेनोग्राफी या विषयात डिप्लोमा करू शकता. या विषयात डिप्लोमाचे शिक्षण घेतल्यानंतर बँक, शिक्षण, न्यायालये अशा बऱ्याच क्षेत्रात उत्तमरित्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात. तुम्हाला जर सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्ही या विषयाचे शिक्षण घेऊन चांगल्या वेतनाची सरकारी निकारी करू शकता.

डिप्लोमा इन आर्किटेक्चर (Diploma in Architecture)

दहावीच्या परीक्षेनंतर तुम्ही आर्किटेक्चर मध्ये सुद्धा डिप्लोमा करू शकता. या कोर्सेमध्ये तुम्हाला इमारतीचे बांधकाम, रचना यासंबंधित सखोल ज्ञान प्राप्त होईल. हा एक कलात्मक विषय असून यात तुम्ही चांगल्याप्रकारे करियर घडवू शकता.

डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (Diploma in Engineering)

भारतात अभियांत्रिकी क्षेत्राला भरपूर प्रमाणात मागणी आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न हे इंजिनिअर बनण्याचे असते. तुम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अभियांत्रिकी याविषयात डिप्लोमा करू शकता. आपल्या भारतात अनेक इन्स्टिट्यूट (Institute) त्याचप्रमाणे कॉलेजेस (Colleges) आहेत जे अभियांत्रिकी या विषयात डिप्लोमा कोर्सेस प्रदान करतात.

हे ही वाचा:

महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक । Music Launch at Mahalaxmi

बिहारमधील कोसळलेल्या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीलाच गोरेगाव उड्डाणपूलाचे काम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss