spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान नेता Netaji Subhas Chandra Bose यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या प्रेरणादायी प्रवास

Netaji Subhash Chandra Bose Birth Anniversary : कायम प्रेरणेचे स्थान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र भोस यांची २३ जानेवारीला जयंती साजरी केली जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस भारतातील अनेकांसाठी एक नायक आहेत. पण हुकूमशाही जपान आणि जर्मनीसोबत त्यांचे जाणे हे त्यांच्यासाठी टीकेचे कारण ठरले. नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे एक महत्त्वाचे नेतृत्व होते. त्यांनी आपल्या क्रांतिकारक कार्याने ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढा दिला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महान नेता आणि क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख आहे.

सभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसामधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाष बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. परीक्षेत ते यशस्वी झाले, परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही. महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी १९२१ मध्ये इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी “आझाद हिंद फौज” (Indian National Army) ची स्थापना केली. या सैन्याने भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटिशांविरोधात लढाई लढली. बोस यांचे प्रसिद्ध घोषवाक्य “जय हिंद” हे भारतीय राष्ट्रीयतेचे प्रतीक बनले. हे शब्द आजही भारतीय जनतेत प्रेरणा देतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाला अनेक स्तरांवर मान्यता मिळाली आहे. त्यांना भारतीय इतिहासात एक क्रांतिकारक म्हणून महत्त्वपूर्ण स्थान आहे.

सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. १९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकत्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले. १९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.

नेताजींच्या संदर्भातील काही प्रेरणादायी वाक्य
“मजा आयेगा जब हमारा राज देखेंगे,
की अपनी ही जमी होगी,
अपना आसमाँ होगा,
शहीदों की चिताओंपर लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरनेवालों का यहीं नामोनिशाँ होगा.”

“हमें सब सुखों को भूल जाना पड़ेगा,
वतन के लिये दुख उठाना पड़ेगा | अय आझाद-हिंदी !
उठो कमर बाँधो ! वतन लुट रहा है,
बचाना पडेगा, हुक्म नेताजी का बजाना पड़ेगा |”

हे ही वाचा : 

घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधारांचे फडणवीसांनी केले विशेष कौतुक, ..ही विजयश्री अविस्मरणीय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss