हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा मानला जातो. अवघ्या काही आठवड्यांवर दिवाळी (Diwali) हा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक घराची साफसफाई व शॉपिंग करण्याच्या मागे लागला आहे. त्यात कर्मचारी वर्गाला मात्र दिवाळी बोनसची (Diwali Bonus) प्रतिक्षा लागली आहे. हा दिवाळी बोनस कधी एकदा हातात येतोय, असं सर्वच कर्मचाऱ्यांना झालं असेल. दरवर्षी अनेक कर्मचारी या दिवाळी बोनस घेतात पण तुम्हाला माहितीय का या दिवाळी बोनसची प्रथा कशी सुरू झाली ?
यंदाच्या वर्षी ०९ नोव्हेंबर पासून दिवाळी हा सण चालू होत आहे. वसुबारस या सणाने दिवाळीची सिरीवत होते. या दिवाळीपुर्वी बाजारपेठा लाईटींग, पणत्या आणि फटाक्यांच्या स्टॉल्सने सजल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक देखील दिवाळीच्या शॉपिंगमध्ये (Diwali Shopping) गुंतला आहे. एकंदरीत काय तर कधी एकदा दिवाळीचा पहिला दिवस उजाडतोय असं सर्वांना झालं असेल. एकदा हातात बोनस आला कि दिवाळीची तयारी करायला सुरुवात करूया अशी अनेकांच्या मनात नक्कीच असणार. पण बोनस म्हणजे नक्की काय ?
दिवाळी बोनस कसा सुरु झाला?
भारतात पूर्वीच्या काळी राबणाऱ्या कामगाराला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून दर आठवड्याला पगार दिला जात असे. मात्र इंग्रजांच्या राजवटीखाली भारतात आठवड्याच्या पगाराच्या हिशोबानुसार ५२ आठवड्यांचा पगार मिळत होता. एक महिन्यात ४ आठवडे असतात. या नियमानुसार वर्षभराच्या पगाराच्या आखणी केली तर तो १३ महिन्यांचा पगार असायला हवा. मात्र इग्रजांच्या पगार धोऱणानुसार १२ महिन्यांचा पगार मिळते असे. कामगारांना जेव्हा पगाराचं गणित समजलं तेव्हा महाराष्ट्रात कामगार आक्रमक झाले. महाराष्ट्रातीसल कामगारांनी १३ महिन्यांचा पगार मिळावा अशी मागणी करत आंदोलन केले होते. कामगारांनी केलेल्या आंदोलनाची दखल इंग्रज सरकारने घेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हा पगार कसा द्यायचा हे ठरवताना दिवाळी (Diwali) हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण असल्याने या सणाच्या आधी एक पगार द्यायचे इंग्रज सरकारचे ठरवले. तो पगार म्हणजे (Diwali Bonus) बोनस. ३० जून १९४० साली ही पगार देण्याची पद्धत सुरू झाली, आणि त्याचा कायदा लागू देखील करण्यात आला होता.
हे ही वाचा :
राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा