Sunday, June 4, 2023

Latest Posts

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

१२ वी चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे १२ नंतर काय करावे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले करिअर यशस्वी रीत्या पूर्ण करायचे असते.

१२ वी चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे १२ नंतर काय करावे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले करिअर यशस्वी रीत्या पूर्ण करायचे असते. काही विद्यार्थ्यांचे त्यांच्या करिअर च्या बाबतीत आधीपासून ठरले असते. पण असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना करिअर ची निवड करण्यात भरपूर अडथळे येतात. त्यामूळे आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत बी एम एस या कोर्स संबंधात संपुर्ण माहिती. चला तर मग जाणून घेऊया बी एम एस कोर्स म्हणजे नक्की काय, करिअरच्या संधी आणि बरच काही.

बी एम एस म्हणजे नक्की काय? 

बी एम एस (BMS) चे संपूर्ण रूप बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ( bachelor of Management studies) आहे. बी एम एस हा अंडरग्राजूएट (Undergraduate) कोर्स आहे. बी एम एस चा कालावधी हा तीन वर्षाचा असतो. हा कोर्स मोठमोठ्या कंपनी सुरळीत चालविण्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थापन क्षेत्रातील अडवान्स अभ्यास प्रदान करतो. या कोर्स मुळे आपल्याला ह्युमन रिसोर्स (Human resource), व्यवस्थापन (Management), अर्थशास्त्र ( Economics), व्यवसाय अभ्यास ( Business studies) चे संपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या कोर्स मुळे विद्यार्थ्यांना व्यापार (Business), उद्योजकता (entrepreneurship), फायनान्स (Finance), ट्रेडिंग (Trading) स्टॉक (Stock) याचे भरपूर ज्ञान मिळते. बी एम एस मध्ये फायनान्स संबंधित सखोल अभ्यास केला जातो. बी एम एस हा कोर्स विद्यार्थांना वास्तविक जगातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार करतो.

बी एम एम कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया

बी एम एस कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी १२ वीत किमान ५०% ते ६०% उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या कोर्स साठी सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ही २२ आणि राखीव श्रेणीतील वयोमर्यादा ही २४ वर्षे आहे. प्रत्येक महाविद्यालयाची वेगवेगळी प्रवेश प्रक्रिया असते. कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला आधी कॉलेज चे फॉर्म भरावे लागतील. त्यानंतर कॉलेज कडून सिलेक्ट झालेल्या विद्यार्थांच्या यादी जाहीर होतात. सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला काही प्रवेश परीक्षा सुद्धा द्याव्या लागू शकतात पण हे लक्षात घ्या प्रवेश प्रक्रिये ची पद्धत हि प्रत्येक महाविद्यालयाची वेगळी असते.

बी एम एस नंतर करिअर च्या संधी

बी एम एस नंतर तुम्हाला करिअर ची चिंता करण्याची गरज नाही. बी एम एस कोर्स पुर्ण केल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रमाणात करिअर च्या संधी उपलब्ध होतात. बी एम एस चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर आपल्याला अनेक गोष्टींबाबत ज्ञान प्राप्त होत. विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापनाचे ज्ञान विकसित झाल्यामुळे ते नोकरी अथवा व्यवसाय करण्यास सक्षम होतात. बी एम एस नंतर तुम्हाला कंपनी मध्ये गुणवत्ता व्यवस्थापन (Quality Manager) एचआर एक्झिक्युटिव्ह (HR Executive), सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager), व्यवसाय विकास कार्यकारी (Business Development Executive) अशा मोठमोठया पदांवर नोकरी लागू शकते.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमधील “द केरला स्टोरी” चित्रपटाची बंदी हटवली

HSC चा निकाल पाहायचा? घ्या या स्टेप्स जाणून

कंगना रनौत पोहोचली केदारनाथ मंदिरामध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss