Thursday, April 25, 2024

Latest Posts

तुम्ही Veg आणि Non Veg दोन्हीही खाता? जाणून घ्या veg आणि Non veg चा संपूर्ण इतिहास

तुम्ही शाकाहारी (Vegetarian) आहात की मांसाहारी (Non Vegetarian) असे प्रश्न तुम्हाला सऱ्हास विचारले जातात. शाकाहारी व मांसाहारी हे दोन आपल्या रोजच्या अन्नातील प्रमुख प्रकार आहेत. या दोन आहारातील मुख्य प्रकारामुळे अनेकदा माणसांमध्ये दोन गट निर्माण केले जातात.

तुम्ही शाकाहारी (Vegetarian) आहात की मांसाहारी (Non Vegetarian) असे प्रश्न तुम्हाला सऱ्हास विचारले जातात. शाकाहारी व मांसाहारी हे दोन आपल्या रोजच्या अन्नातील प्रमुख प्रकार आहेत. या दोन आहारातील मुख्य प्रकारामुळे अनेकदा माणसांमध्ये दोन गट निर्माण केले जातात. शाकाहारी या शब्दाला आपण इंग्रजी मध्ये व्हेजिटेरियन (Vegetarian) असे म्हणतो. व्हेजिटेरियन लोक हे मांसाहार पदार्थ म्हणजेच मच्छी, चिकन, मटण आणि असे कोणतेच पदार्थ खात नाही ज्यात जीव असतो. त्याचप्रमाणे आहारातील प्रमुख प्रकारांमधील दुसरा प्रकार म्हणजे मांसाहार त्यालाच इंग्रजी मध्ये नॉन वेजिटेरिअन म्हंटले जाते.शाकाहारी पदार्थांचे सेवन करणारे लोक हे अजिबात मांसाहार करत नाही परंतु मांसाहाराचे सेवन करणारे लोक हे शाकाहारी पदार्थाचे सुद्धा सेवन करतात. त्याचप्रमाणे व्हेजिटेरिअन प्रकारामध्ये एक अजून एक नवीन प्रकार निर्माण झाला असून त्याला एगीटेरिअन असे म्हंटले जाते. त्याचबरोबर व्हेगन (vegan) या प्रकारचा सुद्धा आहाराच्या प्रमूख प्रकारांमध्ये समावेश होताना दिसून येत आहे. या प्रकारातील लोक हे अतिशुद्ध शाकाहाराचा आस्वाद घेतात. पण आपल्याआपल्या समाजात बहुतांश व्हेग आणि नॉन व्हेग अश्या दोन्ही प्रकारातील पदार्थांचे सेवन करतात म्हणजेच ते मिश्राहार करतात. पण तुम्हाला माहित आहे का व्हेग आणि नॉन व्हेग अश्या दोन्ही प्रकारातील पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

बहुतांश लोक हे मिश्राहारी असतात अशा लोकांना फ्लेक्झेटेरिअन (Flexeterian) असे म्हंटले जाते. फ्लेक्झेटेरिअन लोक हे शाकाहारासोबतच मांसाहार देखील करतात. फ्लेक्झेटेरिअन म्हणजेच सेमी व्हेजिटेरिअन डाएट (Semi vegetarian diet). फ्लेक्झेटेरिअन या शब्दाची निर्मिती ही फ्लेक्सिबल (Flexible) या शब्दापासून झाली आहे. फ्लेक्सिबल म्हणजेच लवचिक. असे लोक हे खाण्याच्या बाबतीत अतिशय लवचिक असतात. अश्या लोकांना आहारात शाकाहारी अथवा मांसाहारी पदार्थ चालतात. या लोकांनाच फ्लेक्झेटेरिअन असे म्हंटले जाते. डच एन्व्हायरमेंटल ऑर्गनिझेशन यांच्या वतीने फ्लेक्झेटेरिअन प्रकारात मोडणारे लोक हे प्रामुख्याने मच्छी व अंड यांचे सेवन करत असून मटणाचे सेवन करण्यास टाळतात. त्याचप्रमाणे डच रिसर्च एजन्सीच्या वतीने असे म्हंटले आहे की आठव्यातून एकदा किंवा दोनदा मांसाहार करणारे लोक हे फ्लेक्झेटेरिअन या प्रकारामध्ये येतात.

आपल्याकडे बहुतांश लोक शाकाहारी पदार्थांसोबत फक्त समुद्री अन्नाचे सेवन करतात. अश्या लोकांना पिक्सेटेरियन (pixterian) म्हंटले जाते. समुद्री अन्नामधून आपल्याला अनेक प्रकारचे पोषण मिळते जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते. आणि यामुळेच पिक्सेटेरियन प्रकारातील लोक समुद्री अन्न खाण्यास प्राधान्य देतात.

हे ही वाचा:

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

अनिल परब आणि सदानंद कदम यांना मिळाला दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss