Friday, December 1, 2023

Latest Posts

तुम्हाला माहित आहे का YouTube ची सुरुवात कशी झाली? पहिला व्हिडिओ कोणता होता ?

आजकाल यू ट्यूब (YouTube) हे संपूर्ण जगासाठी मनोरंजनाचं एक मोठं साधन झाले आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांचं युट्युबच्या (YouTube) माध्यमातून मनोरंजन होतं, तर दुसरीकडे लाखो लोक या प्लॅटफॉर्मच्या मदतीने लाखोंची कमाई करतात.

आजकाल यू ट्यूब (YouTube) हे संपूर्ण जगासाठी मनोरंजनाचं एक मोठं साधन झाले आहे. एकीकडे कोट्यवधी लोकांचं युट्युबच्या (YouTube) माध्यमातून मनोरंजन होतं, तर दुसरीकडे लाखो लोक या प्लॅटफॉर्मच्या मदतीने लाखोंची कमाई करतात. आपल्याला कोणतीही गोष्ट बनवायची असो किंवा काही बघायचं असो आपण यू ट्यूबचा वापर हा करतोच. अगदी घरातील गृहिणीपासून ते मोठं मोठ्या ठिकाणी यू ट्यूब हे पाहिले जातेच. तसेच आजकाल, युट्युबर (YouTuber) बनणं हा देखील एक व्यवसाय आहे. आपण अगदी आपल्या सामान्य नोकरी पेक्षा जास्त पैसे यू ट्यूब च्या माध्यमातून कमवू शकतो. पण युट्युब हा प्लॅटफॉर्म नेमका कधी सुरू झाला? त्यावरील पहिला व्हिडिओ नेमका कोणता होता? या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

स्टीव्ह चेन (Steve Chen), चाड हर्ले (Chad Hurley) आणि जावेद करीम (Jawed Karim) यांनी या तिघांनी सर्वात आधी यू ट्यूबची सुरुवात केली. सण २००५ मध्ये युट्युबची (YouTube) सुरुवात ही केली होती. मात्र, नंतर या तिघांनी ते Google ला १६५ कोटींना विकलं. आज या अ‍ॅपची क्रेझ अशी आहे की दर महिन्याला २०० अब्जांहून अधिक वापरकर्ते याचा वापर करतात. १४ फेब्रुवारी २००५ मध्ये युट्यूब लाँच करण्यात आलं होतं. आज संपूर्ण जगात हे प्लॅटफॉर्म लोकप्रिय झालं आहे. आज लोक या माध्यमातून तगडी कमाई करत आहेत. आजच्या काळात सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असलेले युट्यूब चॅनेल हे T Series आहे. या चॅनेलला २४६ सब्सक्राईब्स आहेत.

तसेच युट्युब या प्लॅटफॉर्मवरील सर्वात पहिला व्हिडिओ हा २४ एप्रिल २००५ रोजी रात्री ८:२७ वाजता अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओचं शीर्षक (Title) ‘मी अ‍ॅट द झू’ आहे. १९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जावेद हत्तींबद्दल बोलत आहे. ते म्हणत आहेत, ‘इथे आम्ही हत्तींसमोर उभे आहोत. हत्तींबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची सोंड खूप लांब असते आणि हे खूप चांगले आहेत.’ या व्हिडिओला आतापर्यंत २९१ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यावेळी हा व्हिडिओ अपलोड झाला त्याच वेळी या व्हिडिओ ला ४.०९ कोटी लोकांनी त्यांच्या चॅनेलला सब्सक्राईब केलं आहे. तर १४ लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. मात्र, सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओशिवाय या चॅनलवर दुसरा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाही. त्यांनी केवळ हा एकच व्हिडीओ अपलोड केला, त्यानंतर कोणताही व्हिडीओ अपलोड केलेला नाही.

हे ही वाचा : 

Israel-Hamas युद्धावर प्रियंका गांधी म्हणाल्या, रक्तपात आणि हिंसाचार कधी थांबणार…

Parth Pawar यांची राजकारणात एन्ट्री होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss