दिवाळी सुरु आहे. सगळीकडे रोषणाई आहे. दिवाळीच्या या दिवसांत ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरात आनंद उत्साह हा नंद असतो त्याचप्रमाणे प्रत्येक घरात आजही सोनपापडीशिवाय सेलिब्रेशन हे अपूर्णच आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही सोनपापडीवरून अनेक मजेशीर मीम्स पाहिले असतील, शेअरही केले असतील.दिवाळीत कोणाला काही गिफ्ट मध्ये गोडाचा पदार्थ द्यायचा असेल तर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती सोनपापडी. आज सोन पापडी म्हणून ती प्रत्येकाच्या ओळखीची असली तरी हे या मिठाईचे खरे नावही नाही. मग या मिठाईचे खरं नाव काय? सोन पापडी प्रसिद्ध होण्याचे मुख्य कारण काय? हे तुम्हाला माहित आहे का ?
कुरुश एफ दलाल यांनी सांगितले की,“सोन पापडी हा पदार्थ मूळ पर्शियन आहे. ‘सोहन पश्माकी’ या शब्दापासून सोनपापडी हे नाव प्रसिद्ध झाले. चौकोनी आकाराचे, कुरकुरीत आणि अनेक थर असणारी या पदार्थाची रचना असते. यामध्ये मुख्य सामग्री चणाडाळीचे पीठ असल्याने सोनपापडी पटकन खराब होत नाही. तसेच सोनपापडीचा इतिहास पाहिल्यास, सोन पापडीला ‘सान पापरी’, ‘शोंपापरी’, ‘सोहन पापडी’, ‘शोन पापडी’ आणि ‘पाटीसा’ म्हणूनही ओळखले जाते. ‘सोहन’ या शब्द मूळ फारसी आहे त्याचा अपभ्रंश होत त्याला सोनपापडी असं नाव देण्यात आलं.
तर भारतात दुधापासून बनलेली मिठाई प्रसिद्ध आहे मात्र दुधापासून बनवलेले पदार्थ लवकर खराब होतात. मुख्यतः सणाच्या वेळी घरात इतरही पदार्थ बनवलेले असताना सर्व मिठाई वैधता संपण्याआधी खाणे शक्य होत नाही. सोनपापडीच्या बाबत मात्र हा प्रश्न उद्भवत नाही. सोनपापडी अनेक दिवस टिकते. शिवाय, दुधापासून बनलेली मिठाई किमतीने थोडी महाग असते. खरंतर सोनपापडीतही दूध असलं तरी अन्य महाग सामग्रीची गरज पडत नाही. सोनपापडीच्या चवीचा मुख्य घटक वेलची असते. वेलची महाग असूनही तिचा वापर कमी केला तरी चव येते. त्यामुळे स्वस्त व मस्त असा सोनपापडीचा पर्याय प्रसिद्ध झाला आहे.
हे ही वाचा :
प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते ‘हीच माझी दिवाळी’
MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी