Thursday, April 25, 2024

Latest Posts

शाळासुरु होण्याआधी या वस्तूंची खरेदी न विसरता करा

जून महिना सुरु झाला की विद्यार्थांना शाळेची चाहूल लागते. उन्हाळाच्या सुट्यांमध्ये मजा मस्ती करून बाहेर फिरून येऊन मुलांना शाळेत जायचे वेध लागतात. जून महिन्यात जवळजवळ सगळ्याच शाळा सुरु होतात.

जून महिना सुरु झाला की विद्यार्थांना शाळेची चाहूल लागते. उन्हाळाच्या सुट्यांमध्ये मजा मस्ती करून बाहेर फिरून येऊन मुलांना शाळेत जायचे वेध लागतात. जून महिन्यात जवळजवळ सगळ्याच शाळा सुरु होतात. मे महिन्याची सुट्टी संपल्यावर सगळीच मुलं शाळेत जायची वाट पाहू लागतात. शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रिय असतो. शाळेत जाण्यासाठी मुलं खूप उत्सुक असतात. पुढच्या वर्गात जाण्यासाठी लागणारी पुस्तक, बॅग्स, घेऊन जाण्यासाठी मुले खूप उत्साहित असतात. आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींसोबत जाऊन गप्पा मारण्याची , त्यांच्या सोबत मधल्या सुट्टीत डबा खाण्याची , त्यांच्यासोबत मस्ती करण्याची मुलांना खूप चाहूल लागलेली असते. त्याचबरोबर आपल्या वर्गशिक्षिका या वर्षी कोण असतील याची प्रत्येक विद्यार्थाना उत्सुकता असते. शाळेत नवीन नवीन वस्तू घेण्यासाठी मुलंमुली आपल्या पालकांसोबत बाजारात खरेदी करण्यास जातात. शाळासुरु होण्यासाठी या महत्वाच्या गोष्टी विकत घेणे गरजेचे आहेत. अश्याच काही महत्वाच्या गोष्टींची आज आम्ही तुम्हाला आठवण करून देणार आहोत.

शाळेचा गणवेश (School Uniform)

शाळेचा गणवेश ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काही शाळेत हा गणवेश शाळेकडूनच दिला जातो. बहुतेक वेळी गणवेश हा आपल्याला बाजारातून काही नेमक्या दुकानातुनच घ्यावा लागतो. विद्यार्थाना नवीन गणवेश घालून शाळेत जायची उत्सुकता असते. मागील वर्षीचा एकच गणवेश घालून विद्यार्थाना कंटाळा येतो अथवा काही विद्यार्थाना जुना गणवेश होत सुद्धा नाही. त्यामुळे शाळा सुरु होण्याआधी विद्यार्थ्यांसाठी नवीन गणवेश न विसरता खरेदी करा.

वह्या पुस्तकं (Notebooks, books)

शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थांसाठी खास असतो. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन वह्या पुस्तकं वापरण्याचा आनंद जणू काही वेगळाच असतो. बहुतेक शाळेंमधून वह्या पुस्तक दिली जातात. मात्र काही वेळेस ही वह्या पुस्तक आपल्याला बाजारातून घ्यावी लागतात.

छत्री, रेनकोट (Umbrella, raincoat)

जून महिना म्हंटल की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पाऊस. भारतातील शाळा या जून महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात सुरु होतात. जून महिन्यापासून सर्वत्र पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणूनच मुलांना शाळेत जाण्यासाठी नवीन छत्री अथवा रेनकोटची गरज भासते. म्हणूनच शाळा सुरु होण्याआधी छत्री अथवा रेनकोटची खरेदी करणे अनिवार्य आहे.

शाळेचे दप्तर (School Bags)

नवीन गणवेश, नवीन वह्या पुस्तके यासोबतच मुलांना नवीन दप्तरची देखील गरज भासते. शाळेत नवीन दप्तर घेऊन जाऊन मित्रमैत्रिणींना दाखवण्याची मुलांना भरपूर उत्सुकता असते. त्याचबरोबर नवीन वर्गात प्रवेश केल्यावर अभ्यासक्रम देखील वाढतो त्यामुळे त्यात बऱ्याच पुस्तकांची भर पडते यासाठी मुलांना दप्तर मोठ्या आकाराचे घ्यावे लागते.


स्टेशनरी (stationery)

एक ते दीड महिना शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांच्या स्टेशनरी हरवून जातात. तसेच मुलांना शाळेत नवनवीन गोष्टी नेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे पेन, पेन्सिल, खोडरबर, कंपॉस बॉक्स या गोष्टींची मुलांना आवश्यकता असते. या नवनवीन गोष्टींचा मुले अगदी जपून वापर करतात.

हे ही वाचा : 

रुळावरून घसरलेली रेल्वे अशाप्रकारे परत रुळावर आणली जाते; जाणून घ्या सविस्तर

औरंगजेबाचं नाव घेणाऱ्यांवर फडणवीस भडकले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss