महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज सोमवार दि. १८ नोव्हेंबरला थंडावला. दोन आठवड्यांपासून राज्यात सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यभरात जोरदार प्रचार केला. या प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘एक हैं तो सेफ हैं’ च्या घोषणेची चर्चा रंगताना दिसली. अशातच, आता सोशल मीडियावर ‘एक हैं तो सेफ हैं’ चा नारा ट्रेंडमध्ये आलाय.
सोशल मीडियाच्या एक्स हॅन्डलवर सध्या #EK_Hain_toh_Safe_Hai असा हॅशटॅग ट्रेडिंग आहे.