Saturday, June 3, 2023

Latest Posts

अंतराळ बद्दल आकर्षण आहे? हा विषय निवडून बनवा तुमचे करिअर उत्तम…

आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानव हा अंतराळावर जाऊन पोहोचला आहे. अंतराळावर जाऊन त्याने विविध प्रकारचे शोध लावले आहे. अंतराळावर जाऊन मानवाने उत्तमरीत्या कामगिरी पार पाडली आहे. बहुतेकांचे स्वप्न अंतराळावर जाण्याचे असते किंवा अंतराळाविषयी अनेकांना भलतेच आकर्षण असते.

आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानव हा अंतराळावर जाऊन पोहोचला आहे. अंतराळावर जाऊन त्याने विविध प्रकारचे शोध लावले आहे. अंतराळावर जाऊन मानवाने उत्तमरीत्या कामगिरी पार पाडली आहे. बहुतेकांचे स्वप्न अंतराळावर जाण्याचे असते किंवा अंतराळाविषयी अनेकांना भलतेच आकर्षण असते. अनेकजणांना अंतराळाविषयी अभ्यास करण्यात भरपूर रस असतो. त्यामूळे स्पेस सायन्स (Space Science) मध्ये तुम्ही उत्तम रित्या करिअर करु शकता. भारतात सुद्धा हा स्पेस सायन्स प्रोग्राम उपलब्ध झाला आहे. त्यामूळे भारतीय तरुण शास्त्रज्ञांसाठी स्पेस सायन्स मध्ये भरपूर प्रमाणात उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या क्षेत्रातून तुम्हाला खगोलशास्त्र ( Astronomy), खगोल भौतिकशास्त्र ( Astrophysics), सौर मंडळ ( Solar system), पृथ्वी विज्ञान ( Earth science) इ. विषयांचे ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. यांमध्ये अनेक प्रकारच्या उपशाखा आहेत. त्यामूळे विद्यार्थी रस असलेल्या विषयात उत्तम करिअर घडवू शकतात. चला तर मग स्पेस सायन्स मधील करियर आपण जाणून घेऊया.

१) खगोलशास्त्र ( Astronomy)

स्पेस सायन्स मधील खगोलशास्त्राचे काम हे बाह्य अवकाश संशोधन ( Outer Space Reasearch) करण्याचे असते. खगोलशास्त्रज्ञ हे आऊटटर स्पेस रिसर्च चा अभ्यास करतात. खगोलशास्त्र मध्ये आकाशगंगा, सूर्य, तारे, ग्रह इत्यादींचा समावेश होऊन अभ्यासक पृथ्वीवरुन या गोष्टींचा अभ्यास करतात.

२) अंतराळवीर (Astronaut)

अनेक जणांचे लहानपणापासून अंतराळवीर बनण्याचे स्वप्न असते. स्पेस सायन्स च्या साहाय्याने व मेहनतीने हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अंतराळात जाऊन संशोधन करणाऱ्या व्यक्तींना अंतराळवीर असे म्हणतात. त्यांना हे संशोधन पूर्ण करण्यासाठी बरेच महिने लागतात.

३) स्पेस रिसर्च ( Space Research)

स्पेस रिसर्च हे खूप मोठ्या प्रमाणावर असलेले क्षेत्र मानले जाते. स्पेस सायन्स मधील ह्या विषयांचा अभ्यास प्रत्येकालाच करणे आवश्यक आहे.

४) स्पेस इंजिनिअरिंग ( Space engineering)

स्पेस इंजिनिअर चे काम हे अंतराळ मोहिमेसाठी लागणारी सर्व उपकरणे बनविण्याचे असते.

५) स्पेस टेक्नॉलॉजी ( Space Technology)

या क्षेत्रात आपण उत्तम पणे आपले करिअर घडवू शकतो. यामध्ये काही टेक्नॉलॉजी रीलेटेड उपकरणे बनविण्याचे काम केले जाते.

हे ही वाचा:

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला मोठा निर्णय

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss