संपूर्ण देशात दिवाळीचा उत्सव हा जोरदार साजरा केला जात आहे. परंतु दुसरीकडे दिवाळीच्या मुहूर्तावर हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत हैदराबादमधील तब्बल ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.हैदराबाद (टीएस) येथील केमिकल गोदामाला ही भीषण आग लागली आहे. या लागलेल्या आगीत २ महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आग इतकी भीषण होती की ती चार मजल्यापर्यंत पसरली.
अधिक माहिती देताना डीसीपी सेंट्रल झोन व्यंकटेश्वर राव यांनी सांगितले की, हैदराबाद येथील बाजारघाट, नामपल्ली येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गोदामाला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात २ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. तर १६ जण किरकोळ जखमी होऊन सुखरूप बचावले. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी नामपल्ली आगीत झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
हैदराबाद (TS) च्या नामपल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील एका गोदामात ही घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांसह आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. डीजी (अग्निशमन सेवा) नागी रेड्डी म्हणतात, “इमारतीमध्ये केमिकल्सचा बेकायदेशीररीत्या साठा करण्यात आला असावा. इमारतीच्या स्टिल्ट एरियामध्ये केमिकल्सचा साठा करण्यात आला होता आणि या केमिकल्समुळे आग लागली होती. एकूण २१ जणांना वाचवण्यात आले, बाहेर त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जणांवर उपचार सुरू आहेत. सर्व लोकांना अपार्टमेंट इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे. सुरुवातीच्या तपासात कार रिपेअरिंगदरम्यान स्पार्किंग होऊन आग लागल्याचे पोलिसांना आढळून आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा :
प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते ‘हीच माझी दिवाळी’
MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी