spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

माजी मुख्यमंत्री Jagan Mohan Reddy यांचा आलिशान राजवाडा वादाच्या भोवऱ्यात

आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आलिशान महालाची चर्चा सुरू झाली आहे. जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणममधील रुशीकोंडा (Rushikonda) टेकडीवर समुद्रकिनारी स्वप्नवत आलीशान पॅलेस उभा केला असून ज्याची अंदाजे किंमत सुमारे ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Rushikonda hill in Visakhapatnam: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानाला याआधी राजकीय मुद्दा बनवून बरीच चर्चा करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या सोयींमुळे भाजपने ‘शीशमहाल’ (Shishmahal) म्हणत निवडणुकीत राजकीय मुद्दा केला आणि सत्ताही खेचून आणली. निवडणूक होताच आता शीशमहल तितकासा महत्वाचा राहिलेला नाही. तर, आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आलिशान महालाची चर्चा सुरू झाली आहे.

जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणममधील रुशीकोंडा (Rushikonda) टेकडीवर समुद्रकिनारी स्वप्नवत आलीशान पॅलेस उभा केला असून ज्याची अंदाजे किंमत सुमारे ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आलिशान राजवाड्याच्या आतील दृश्याविषयी बोलताना एका अहवालात असे म्हटले आहे की बंगल्याची रचना सोन्याची सजावट, इटालियन संगमरवरी मजले आणि आलिशान फर्निचरसह अनेक भव्य गोष्टींनी केली आहे.मात्र हा पॅलेस आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे.

या हवेलीत बसवलेल्या बाथटबची किंमत ४० लाख रुपये आहे आणि प्रत्येक कमोडची किंमत १०-१२ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, असा आरोप सत्ताधारी टीडीपीने केला आहे. यासोबतच या हवेलीने कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) नियमांचे घोर उल्लंघन केल्याचा आरोप आहे. टीडीपीचे म्हणणे आहे असे देखील आहे की मागील वायएसआर काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) सरकारने कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केले.तसेच मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने जगम मोहन रेड्डी (Jagam Mohan Reddy) यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तथापि, वायएसआरसीपीचे माजी मंत्री गुडिवाडा अमरनाथ यांनी जगन मोहन रेड्डी यांच्या बंगल्याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाचा बचाव केला आणि ते म्हणाले की ते कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलं आहे.

हे ही वाचा : 

Holi 2025: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी होळी निमित्त ‘आई माऊलीचा उदो उदो’ गाण्यावर धरला ठेका

Pankaja Munde On Santosh Deshmukh Murder Case: सुरेश धसांच्या आरोपांवर पंकजा मुंडेंच थेट प्रत्युत्तर म्हणालया, मी भाजपाची राष्ट्रीय नेता असताना…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss