नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाचे रौद्र रुप दिसले. तीन देशातील जमीन हादरली. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी दिनांक ७ जानेवारी २०२५ सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, बिहारपासून दिल्लीपर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र नेपाळ सीमेजवळ तिबेट असल्याचे सांगितले जाते, जेथे त्याची तीव्रता ७.१ इतकी मोजली गेली आहे.
पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सकाळी ६:३७ वाजता (७ जानेवारी) भूकंपाचे धक्के जाणवले, जे सुमारे १५ सेकंद चालले. याशिवाय जलपाईगुडीमध्ये सकाळी ६:३५ वाजता आणि त्यानंतर काही वेळातच कूचबिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अद्याप कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय बिहारची राजधानी पाटणा व्यतिरिक्त इतर काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचवेळी दिल्ली-एनसीआर आणि यूपीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बिहारमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी मोजण्यात आली. समस्तीपूर, मोतिहारीसह अनेक भागात सकाळी ६:४० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ५ सेकंद पृथ्वी हादरत राहिली. भूकंप इतका जोरदार होता की लोक घाबरून घराबाहेर पडू लागले.
नेपाळ सरकारच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी नेपाळमध्ये जाणवलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटमधील नेपाळ-चीन सीमेवरील डिंघे कांती येथे असल्याची पुष्टी झाली आहे. नेपाळ सरकारच्या भूवैज्ञानिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्या भागातील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७ एवढी होती. सकाळी 6.35 वाजता आलेल्या भूकंपाने नेपाळचा बहुतांश भाग हादरला. याचा तिबेट प्रदेश तसेच नेपाळच्या पूर्व ते मध्य प्रदेशाला मोठा फटका बसला आहे. भूकंपाचे धक्के काठमांडूपर्यंत जाणवले. पहाटे झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर काठमांडूचे लोक घराबाहेर पडले. बऱ्याच दिवसांनी काठमांडूमध्ये भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. भूकंपामुळे कुठे आणि किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?