Zarkhand Rape: अतिशय भयावह आणि संतापजनक एक घटना समोर आली आहे. ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यातील ३ मुलींवर १८ मुलांनी मिळून सामूहिक बलात्कार करण्यात आलं आहे. ही धक्कादायक घटना झारखंडमधील खूंटी जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसर हादरलं आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री घडली. रनिया परिसरात एका लग्न समारंभात सहभागी होऊन ५ मुली घरी परतत होत्या. यावेळी काही युवकांनी त्यांचा पाठलाग करत निर्जनस्थळी सर्व मुलींचे अपहरण केले. त्यानंतर त्या मुलांनी जबरदस्तीने या मुलींना डोंगराच्या दिशेने घेऊन गेले. यावेळी २ मुलींनी आरोपींच्या हाताला दाताने जोरात चावत त्यांच्या तावडीतून सुटून पळाल्या. या घटनेतील १८ आरोपींनी ३ मुलींसोबत सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर या मुलींना जंगलात सोडून फरार झाले. असे पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहितीतून सांगण्यात आले आहे. जंगलातून या मुली गावात पोहचल्या आणि त्यांनी आई वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्व गावकरी पीडित मुलींसह पोलीस स्टेशनला पोहचले. ५ पैकी ३ मुलींचे वय १२-१६ वयोगटातील होते तर आरोपींचे वय १२-१७ वयोगटातील होते. पीडित मुलींच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुलींची मेडिकल चाचणी करण्यात आली. पोलिसांनी सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी या सर्वांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. या घटनेतील आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत गावकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला.
जंगलातून या मुली गावात पोहचल्या आणि त्यांनी आई वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्व गावकरी पीडित मुलींसह पोलीस स्टेशनला पोहचले. खूंटी – झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात सामुहिक बलात्काराने खळबळ माजली आहे. याठिकाणी ५ अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं त्यातील तिघींवर १८ अल्पवयीन मुलांनी गँगरेप केल्याची घटना घडली आहे. अपहरण केलेल्या ५ मुलींपैकी २ जण आरोपींच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी गावात पोहचवून त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व प्रकरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरून भयावह परिस्तिथी निर्माण झाली आहे.
हे ही वाचा: