spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

गौतमी पाटीलचा प्राजक्ता माळीला पाठिंबा; नेमकं काय म्हणाली…

Gautami Patil Support Prajakta Mali : गेल्या काही दिवसांपासून मस्साजोग प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात अनेकांचे नाव जोडले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड असल्याचे बोललं जात असून तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माझी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तुम्ही महिलांचा चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्यदेखील करता. कुणाच्याही कुबड्यांशिवाय एखादी महिला यशस्वी होऊ शकत नाही का? असा प्रश्नही प्राजक्ता माळीने विचारल असता तिने याबाबत ठोस भूमिका घेतल्यामुळे कलाक्षेत्रातून तिचे कौतुक केले जात आहे. त्यातलीच एक कलाकार आणि नृत्यांगणा गौतमी पाटील हिने देखील प्राजक्ता माळीच्या वक्तव्याचे समर्थन पाठिंबा दर्शविला आहे.

गौतमी पाटीलने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओमार्फत गौतमी पाटीलने प्राजक्ता माळीच्या वक्तव्याचे सर्मथन केले आहे. प्राजक्ता तू जे काही बोललीस ते सर्व बरोबर होतं. आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत, असेही गौतमी पाटीलने म्हटले आहे. मी देखील एक कलाकार आहे. त्यामुळे माझीही तुम्हा सर्वाना विनंती आहे, की एखाद्या कलाकाराला कलाकाराच्या जागेवरच राहू द्या, त्याचे नाव कोणत्याही राजकारण्यासोबतच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीसोबत त्याचे नाव जोडू नका. तुम्ही कलाकाराच्या पाठीमागे उभे राहा. प्रेक्षक म्हणून आमच्यावर प्रेम करा. प्राजक्ता ताई तू या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नको. तू अशीच पुढे जात राहा. हसत राहा आणि खूप छान राहा, असे गौतमी पाटील म्हणाली.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss