GBS in Mumbai Update : या जीबीएस सिंड्रोमने पुण्यात धुमाकूळ घातलाच आहे, त्याचबरोबर आता या सिंड्रोमने मुंबईत देखील शिरकाव केल्याची घटना समोर आली आहे. जीबीएस सिंड्रोमचा पहिला रुग्ण मुंबईत आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पुण्यातील जीबीएस सिंड्रोम आजाराचा वेगाने प्रसार होत आहे. आतापर्यंत एकही रुग्ण मुंबई आढळला नव्हता, पण आता एक रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली आहे. त्याचबरोबर या रूग्णाच्या कुटूंबियांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना दिली आहे. शिवाय या रुग्णावर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील मुरजी पटेल यांनी केल्या आहेत.
‘जीबीएस’ आजार नेमका काय?
गिलियन-बैरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्बलतादायक न्यूरोलॉजिकल विकार आहे. यामध्ये, शरीराच्या प्रतिकारशक्तीचे प्रणाली (immune system) नर्व्हस सिस्टमवर हल्ला करते. यामुळे हात,पाय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये मांसपेशी दुर्बल होतात, सुन्नता आणि पॅरेलिसिसची समस्या उद्भवू शकतो. हा विकार हळूहळू सुरू होतो आणि काही वेळाने हा आजार तीव्र रूप धारण करतो.
उपचार:
यात सामान्यतः रुग्णाला रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असते, काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासाची किंवा हृदयाची समस्या होऊ शकते.
इम्यूनोग्लोबुलिन थेरपी (IVIG): रक्तातील प्रतिकारशक्तीला संतुलित करण्यासाठी या थेरेपीचा वापर केला जातो.
प्लाझ्मा फेरसिस: शरीरातून दोषपूर्ण प्रतिकारशक्तीचे घटक काढून टाकले जातात.
फिजिकल थेरपी: रुग्णाला पुन्हा पाय चालवण्यासाठी आणि सामान्य हालचाली पुन्हा मिळवण्यासाठी फिजिकल थेरेपीचा वापर केला जातो.
हे ही वाचा :
Follow Us