Friday, December 1, 2023

Latest Posts

यंदा भाऊबीजच्या निमित्ताने बहिणीसाठी खास फायनान्शिअल गिफ्ट द्या

भाऊबीज (Bhaubij) हा बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला हा सण (Diwali) आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.

भाऊबीज (Bhaubij) हा बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला हा सण (Diwali) आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. पण अनेकांना काय भेटवस्तू द्यावी, हे सूचत नाही. यंदाच्या भाऊबीजला तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला (Sister) ओवाळणी म्हणून तिच्या भविष्यात उपयोगी होईल असं गिफ्ट देऊ शकता. तुम्ही बहिणीला फायनान्शिअल गिफ्ट (Financial Gifts) देऊ शकता. यामुळे तिला भविष्यात आर्थिक मदत होईल.

यंदा भाऊबीजला (Bhaubij) तुम्ही बहिणीला फायनान्शिअल गिफ्ट (Financial Gifts) देऊन तिचं भविष्य आणखी सुरक्षित करु शकता.

 

आरोग्य विमा (Health Insurance)
आजकाल आरोग्याशी संबंधित समस्या खूप सामान्य आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला आयुर्विमा (Health Insurance) भेट देऊ शकता. यामुळे आरोग्याच्या समस्यांमुळे उद्भवणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन करणं सोपं होऊन तिचं भविष्य सुखकर होईल.

जीवन विमा (Life Insurance)
फायनान्शिअल गिफ्ट देताना लाइफ इन्शुरन्स हा एक चांगला पर्याय आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या बहिणीला जीवनाची सुरक्षा देत आहात. तुम्ही तुमच्या बहिणीला ही खास भेट देऊ शकता.

शेअर्स (Shares)
ही भेट थोडी जोखमीची असू शकते. कारण, शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने फायदा होण्यासोबतच नुकसान होण्याचीही शक्यता असते. तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन शेअर्स खरेदी करू शकता, त्यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे शेअर्स खरेदी केले आहेत, त्यांच्या डीमॅट खात्यात ते ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

डिजिटल गोल्ड (Digital Gold)
जुन्या काळापासून सोने ही एक चांगली भेटवस्तू मानली जाते. तुम्ही बहिणीसाठी सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्ही डिजिटल गोल्ड (Digital Gold) ही गिफ्ट करू शकता. या दिवाळीत तुमच्या बहिणीसाठी सोने खरेदी करण्याऐवजी, सॉवरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) किंवा गोल्ड ईटीएफ (Gold ETF) ही खरेदी करु शकता.

हे ही वाचा : 

दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स

आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss