Saturday, November 18, 2023

Latest Posts

Goa National Games, PM मोदींनी गोव्यात राष्ट्रीय खेळांच्या महाकुंभाचे केले उद्घाटन, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिनांक २६ ऑक्टोबर रोजी मडगाव, गोवा येथे ३७ व्या राष्ट्रीय खेळ महाकुंभचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिनांक २६ ऑक्टोबर रोजी मडगाव, गोवा येथे ३७ व्या राष्ट्रीय खेळ महाकुंभचे उद्घाटन केले. गोव्यात प्रथमच राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत हे खेळ होणार आहेत. १०,००० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत भाग घेतील. या खेळांमध्ये २८ ठिकाणी ४३ स्पर्धांमध्ये देशभरातील १० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पंतप्रधानांचा राज्याच्या संस्कृती आणि अस्मितेचे प्रतीक असलेली कुणबी शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी मोदींनी कार्यक्रमासाठी जमलेल्या प्रेक्षकांना अभिवादन केले.पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाने खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रगतीचे स्मरण केले आणि केंद्र प्रायोजित योजनांतर्गत खेळांसाठी एक इकोसिस्टम तयार केली, ज्याची पूर्वीच्या राजवटींद्वारे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. खेळाच्या या महाकुंभाच्या उद्घाटनाबद्दल सर्वांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गोव्याच्या मातीवर अनेक खेळाडू घडले आहेत. विशेषत: फुटबॉलच्या क्षेत्रात गोव्याने अनेक खेळाडू दिले आहेत. त्याचे वेड प्रत्येक गल्लीबोळात दिसते.

७० वर्षांत जे घडले नव्हते ते यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत घडल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विक्रमी पदके जिंकली आहेत. यावेळीही पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी ७० पदके जिंकली आहेत. आपली लोकसंख्या एवढी मोठी आहे या गोष्टीची देशाला नेहमीच उणीव राहिली आहे, पण पदकतालिकेत आपण मागे पडलो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी मेडल टेलीमध्ये चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वीच्या सरकारांनी खेळांबाबत नेहमीच दुहेरी वृत्ती ठेवली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. यापूर्वी खेळांना एवढे बजेट दिले जात नव्हते. ते म्हणाले की, हा फक्त खेळ आहे, याचा एवढा विचार कशाला, पण आमच्या सरकारने हे पाऊल बदलले आहे.

तर पंतप्रधान म्हणाले, “राष्ट्रीय खेळ अशा वेळी आयोजित केले जात आहेत जेव्हा भारताचे क्रीडा विश्व एकामागून एक यशाची नवीन शिखरे गाठत आहे. सध्या आशियाई पॅरा गेम्स देखील सुरू आहेत. यावेळी गोव्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हे ही वाचा : 

धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss