Gold Rate Today: सोन्याचा भाव आजही गगनाला भिडत आहे. सोन्याचे दर लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून या वाढीचे मुख्य कारण मजबूत जागतिक कल असल्याचे सांगितले जात आहे. सध्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून या अर्थसंकल्पात (Budget) सोने आणि चांदीच्या दरांबाबत विशेष काही निर्णय घेतला गेला नाही. सोन्या आणि चांदीबाबत (Gold & Silver) मागील अर्थसंकल्पात निर्णय घेण्यात आला होता.
जानेवारी महिना आता संपला असून आणि सोन्याच्या दरात विशेष काही फरक दिसत नाहीये. सोन्याचे दर मात्र दिवसेंदिवस वाढत असून MCX वर, सोन्याचा वायदा सकाळी ७६ रुपयांच्या वाढीसह ८३,४०० रुपयांवर पोहोचला, जो शेवटच्या सत्रात रु. ८३,३२४ वर क्लोज झाला आणि आज रु.८३,३३४ वर उघडला. तर, चांदीचे (Silver) दर घसरलेले असून ९८,५०० रुपये प्रति किलोने आहे पण सध्या उच्चांकी किंमतीवरून चांदी प्रचंड स्वस्त झाली आहे. त्यामुळे ज्यांना चांदीची खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे. वायदे दरासोबतच देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याचे भाव वधारलेले दिसले. २४ कॅरेट (24 Carate) सोन्याच्या किमत ८५,२०० रुपये आहे. २२ कॅरेट (22 Carate) सोन्याचा भाव हा ७८,१०० रुपये तर त्याचवेळी, भारतीय ग्राहकांना आज चांदी ९८,५०० रुपये प्रति किलोग्रॅम या दराने उपलब्ध आहे.लवकरच सोन्याचे दर हे लाखाच्या घरात जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र रात्रीतून वाढलेल्या दरामुळे सामान्य जनता अवाक झाली आहे.
हे ही वाचा :
बॉलीवूड अभिनेत्री Priyanka Chopra भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल