spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

Gold Silver Price : सोन्याने रचला इतिहास ! लग्नसराईच्या तोंडावर सोन्याने गाठला उच्चांक

काही महिन्यांपासून भारतात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होताना दिसत आहेत. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यातच (गुरुवारी) सोन्याचा १० ग्रॅमचा दर ८९ हजार ५०० रुपयांवर गेला असून जीएसटीसह हाच दर ९२ हजार १८५ रुपयांनी वाढला आहे. तब्बल सव्वा महिन्याने १३ हजार २८५ रुपयांनी सोने महागले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सराफ बाजारात दरवाढ पहायला मिळाली होती. जानेवारीच्या पहिल्याच दिवशी प्रति तोळ्यामागे १ हजार ८५४ रुपयांनी वाढ झाली होती. तेव्हापासून सोन्याच्या दरामध्ये चढता क्रम दिसू लागला आहे.

Gold Silver Price : काही महिन्यांपासून भारतात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होताना दिसत आहेत. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यातच (गुरुवारी) सोन्याचा १० ग्रॅमचा दर ८९ हजार ५०० रुपयांवर गेला असून जीएसटीसह हाच दर ९२ हजार १८५ रुपयांनी वाढला आहे. तब्बल सव्वा महिन्याने १३ हजार २८५ रुपयांनी सोने महागले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी सराफ बाजारात दरवाढ पहायला मिळाली होती. जानेवारीच्या पहिल्याच दिवशी प्रति तोळ्यामागे १ हजार ८५४ रुपयांनी वाढ झाली होती. तेव्हापासून सोन्याच्या दरामध्ये चढता क्रम दिसू लागला आहे.

सोन्याच्या दरात इतकी वाढ कशामुळे झाली?
गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचे नेमके कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबतच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण वाढलेले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की “लाकूड, वाहने, सेमिकंडक्टर आणि फार्मास्युटिकल्सवर येत्या महिन्यात किंवा लवकरच आयात शुल्क लावण्यात येणार आहे”. या वक्तव्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या दरात भाववाढ झालेली दिसत आहे.

चांदी कितीने महागली?
सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. चांदीचा भाव ७०० रुपयांनी वाढून १ लाख ३०० रुपये रुपये प्रति किलो झाला आहे. सोनं महाग होऊनही मुंबईत काल (गुरूवारी) दिवसभरात ३६० कोटींची उलाढाल पहायला मिळाली. मात्र, सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या आजही तेवढीच असल्याचं दिसून येत आहे. लग्नसराईच्या तोंडावर सोने आणखी महाग होणाऱ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. १५ मार्चपर्यंत एक लाख रुपये तोळे सोन्याचा दर असण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा दर
७ फेब्रुवारीला सोन्याचा दर ८४,६९९ रुपयांवर पोहचला होता.
०१ फेब्रुवारीचा दर ८५,६६५ रुपये इतका होता.
११ फेब्रुवारीला सोन्याचा दर ८५,९०३ रुपयांवर पोहचला होता.
२० फेब्रुवारीला सोन्याचा दर जीएसटीसह ९२ हजार १८५ रुपयांवर येऊन ठेपला आहे.

Latest Posts

Don't Miss