Saturday, April 20, 2024

Latest Posts

खुशखबर! केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता, तर महाराष्ट्राला…

अवघ्या २-३ दिवसांपूर्वी जून महिना हा संपला आहे. आणि जून महिना चालू झाला आहे. आता सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अवघ्या २-३ दिवसांपूर्वी जून महिना हा संपला आहे. आणि जून महिना चालू झाला आहे. आता सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच महाराष्ट्रात १० जूनला (Maharashtra Monsoon Update) मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सध्या अनेक ठिकाणी कडाक्याचं ऊन देखील पडत आहे. या कडाक्याच्या उन्हापासून कधी सुटका मिळणार याकडे सर्वांचे लक्ष हे लागले आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे आता सर्व नागरिक हे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता नागरिक देखील पावसाची प्रतीक्षा करत आहेत. तसेच सध्या मान्सून हा अंदमान आणि निकोबार बेटांपर्यत पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आता वेगाने पुढे सरकत आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात १० जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात राज्यात पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तर केरळमध्ये मान्सून ४ जूनला दाखल होणार आहे

तर दुसरीकडे राज्याच्या बाबतीत बघायचे झाले तर, राज्यासह देशात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे.

हे ही वाचा:

Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

संजय राऊतांच्या नाशिक दौरा ठाकरेंना महागात? अख्खी नगरपंचायत शिंदे गटात

Ruturaj Gaikwad झाला विवाहबद्ध!, लग्नानंतर Sayali Sanjeev ची पोस्ट चर्चेत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss