गूगलच्या नव्या कारवाईनुसार, या वर्षी १ डिसेंबरपासून काही ठराविक जीमेल अकाउंटस बंद करण्यात येणार आहेत. आपल्या अब्जावधी वापरकर्त्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, कंपनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जर एखाद्या जीमेल अकाउंटवरून एकही ऍक्टिव्हिटी केलेली नसेल तर गूगलतर्फे ते खाते हटवण्यात येणार आहे. या खात्यावरील संपूर्ण डेटा अर्थात तुमच्या ड्राइव्हमधील फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स सगळं काही यामुळे तुम्ही डिलीट होणार आहे. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीत साइन इन केले नसेल किंवा तुमचे खाते वापरले नसेल तर गूगल तुमचे खाते हटवणार आहे. हे धोरण तुमच्या वैयक्तिक गूगल खात्यावर लागू होते. तुमचे ऑफिस, शाळा किंवा इतर संस्थेद्वारे तुमच्यासाठी सेट केलेल्या कोणत्याही गूगल खात्याला हा नियम लागू होत नाही. अशाप्रकारचे निष्क्रिय खाते हे घोटाळेबाज व ऑनलाईन स्कॅमर्ससाठी तयार संधी असते. या अकाउंट्सवर अन्य युजर्सची फसवणूक तुमच्या नावे होऊ नये यासाठी गूगलने अशी खाती हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
गूगलतर्फे जर तुमचे खाते हटवण्यात येणार असेल तर त्यापूर्वी तुम्हाला सूचित केले जाईल. तुम्हाला जर अशा प्रकारची सूचना प्राप्त झाली किंवा तुमच्याकडे असे खाते आहे याची तुम्हाला अगोदरच कल्पना असेल तर आपण खालील मार्गांनी आपले अकाउंट सक्रिय ठेवू शकता. गूगलला तुमचे खाते हटवण्यापासून रोखता येणार आहे. त्यासाठी दर दोन वर्षांनी एकदा तरी तुमच्या जीमेल (Gmail) खात्याचे साइन इन करा. तुमचे खाते सक्रिय राहील याची खात्री करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी तुमचे जीमेल (Gmail) खाते वापरा. जरी तुम्ही दररोज Gmail वापरत नसला तरीही, काही दिवसांच्या अंतराने एखादा तरी मेल या अकाउंटचा वापर करून पाठवा व प्राप्त करा.
हे अकाउंट वापरून युट्युब (YouTube) व्हिडिओ पाहणे हा तर सर्वात सोपा पर्याय आहे. गुगल Google ड्राइव्हचा वापर करा तसेच Google सर्चच्या पर्यायाचा वापर करा.
हे ही वाचा :
प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते ‘हीच माझी दिवाळी’
MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी