Friday, April 26, 2024

Latest Posts

सरकारला पुन्हा ५०० आणि १००० च्या नोटा चलनात आणाव्या लागणार, डॉ. भालचंद्र मुणगेकर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) काल मोठी घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारामधील २००० रुपयाच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) काल मोठी घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारामधील २००० रुपयाच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयानंतर आता पुढे काय होणार असा प्रश्न देशातील जनतेला पडला आहे. पण यापैकी एक शक्यता अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली आहे. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, खरतर सरकारने आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींनी या निर्णयासाठी देशाची माफी मागायला पाहिजे होती. परंतु माफी मागण्याऐवजी घेतलेला चुकीचा निर्णय दुरुस्त करण्यासाठी आता बरोबर उलट निर्णय सरकारला घ्यावा लागत आहे आणि हि सरकारची नामुष्की आहे असे भालचंद्र मुणगेकर म्हणाले.

पुढे डॉ भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, आयबीआयने घेतलेल्या निर्णयाने सिद्ध झाले आहे की दुध का दूध-पानी का पानी अशा स्वरुपचा स्वायत्त निर्णय घेणं अपेक्षित होते. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या कायद्यानुसार स्वायत्त आहे असे ते म्हणाले. २००० रुपयांची नोट मागे घेतल्यावर आता अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण भर हा ५०० रुपयांच्या नोटांवर पडणार आहे. भारतामध्ये पुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला १००० रुपयांची नोट चालनामध्ये आणावी लागणार आहे. ते सिद्ध झाल्याने सरकारला जुन्यासारख्या ५०० आणि १००० च्या नोटा चलनामध्ये आणाव्या लागणार आहेत.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss