सणासुदीच्या काळात सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ झाली आहे ऑक्टोबर महिन्याचे कर संकलन विक्रमी ठरले आहे ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण जीएसटी संकलन १.७२ लाख कोटी रुपये झाले आहे. एक जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मधील जीएसटी संकलनाची पातळी दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरली आहे. २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात यावर्षीच्या तुलनेने जीएसटी संकलनात १३ टक्के वाढ झाली आहे.
१ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या संकलनाची माहिती मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. त्यानुसार ऑक्टोबर मध्ये १,७२,००३ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यामध्ये ३०,०६२ कोटी रुपये CGST ३८,१७१ कोटी रुपये जमा झाले आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सरासरी जीएसटीचे संकलन १. ६६ लाख कोटी रुपये आहे. जे ११ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत या ऑक्टोबरमध्ये जीएसटीचे संकलन जास्त प्रमाणात झाले आहे अशी माहिती वित्त मंत्रालयाने दिली.
हे ही वाचा :
कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा