spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Guillain Barre Syndrome : पुण्यात GBS चा पहिला बळी; जाणून घ्या सविस्तर बातमी

Guillain Barre Syndrome : पुण्यात काही दिवसांपासून गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS चे बरेच रुग्ण आढळून आले आहेत. गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे ७३ रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यातीलच एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण डीएसके विश्वमध्ये राहत होता. तो मूळचा सोलापूरचा असून काही काळासाठी पुण्यात राहत होता. या तरुणाचा गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली. GBS मुळे तब्येत खराब होत असल्यामुळे त्याला त्वरित सोलापूचरच्या एक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं. त्यानंतर तो या आजारातुन बारा देखील झाला. मात्र पुन्हा या आजाराने डोक वर काढतं. त्याला श्वसनाचा त्रास झाल्याने तो तरुण पुन्हा रुग्णालयात दाखल झाला पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय?
गुलियन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome – GBS) एक दुर्बल आणि तात्काळ उपचाराची गरज असलेली न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यामध्ये शरीराच्या प्रतिकारक प्रणाली (immune system) आपल्या मज्जातंतू (nerves) व इतर अवयवांवर आक्रमण करते. यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये कमजोरी येते. Guillain-Barré Syndrome (GBS) हा एक दुर्मिळ परंतु गंभीर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून परिधीय मज्जासंस्थेवर (मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या बाहेरील नसांचे जाळे) हल्ला करते. GBS चे नेमके कारण पूर्णपणे समजलेले नाही, परंतु ते अनेकदा श्वसन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गासारख्या संसर्गापूर्वी होते.

उपचार :
डॉक्टरांकडून पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच उघड्यावरचं आणि शिळं अन्न खाणं टाळावं, असं सांगण्यात आलं आहे. स्नायूंचा कोणताही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांना भेटा असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा : 

महाराष्ट्रातील तिघांना पद्म पुरस्कार जाहीर; कसा मिळतो पद्म पुरस्कार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss