१४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा बालदिन हा दरवर्षी साजरा केला जातो. हा महत्त्वपूर्ण दिवस आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ज्यांना प्रेमाने “चाचा नेहरू” म्हटले जाते आणि यांची जयंती देखील आज आहे. ते लहान मुलांबद्दलच्या प्रेमासाठी प्रसिद्ध होते. भारत आपल्या तरुण नागरिकांचा सन्मान आणि उन्नती करण्यासाठी बाल दिवस साजरा करतो.
बालदिनाचा इतिहास आणि महत्त्व :
भारतामध्ये दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी आपल्या तरुण नागरिकांचा सन्मान करण्यासाठी आणि हा दिवस साजरा करण्यासाठी बालदिन किंवा बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच १४ तारखेला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती देखील आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांबद्दलच्या प्रेमामुळे “चाचा नेहरू” म्हणून संबोधले जाते. लहान मुलांकडे पाहून नेहरूंनी देशाचे भविष्य म्हणून पाहिले. त्यांचा वारसा देशाच्या तरुणांच्या उन्नत्तीसाठी आणि त्यांना पाठिंबा देण्याची वचनबद्धता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. “लहान मुले हे बागेतील फुलांच्या कळ्यांसारखी असतात आणि त्यांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालनपोषण केले पाहिजे, कारण तेच आपल्या देशाचे आणि उद्याचे तरुण नागरिक आहेत,” असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका व्याख्यानात म्हंटल होतं. या भावनेतून त्यांनी भावी पिढ्यांना घडवण्यासाठी शिक्षण, प्रेम आणि मार्गदर्शनाची गरज व्यक्त केली होती.
बालदिनाची तारीख आणि इतिहास :
बालदिवस हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर १९६४ पासून भारतामध्ये १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. २० नोव्हेंबरला संयुक्त राष्ट्र संघाने सुरुवातीला सार्वत्रिक बालदिन म्हणून निश्चित केला होता. तर भारतामध्ये नेहरूंच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ या दिवसाचे पालन केले जाते. भारत देशातील शाळा आणि समुदाय मुलांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित विशेष हा कार्यक्रम आणि उत्सवासह साजरा करतात.
बालदिन का साजरा करतात?
बालदिन समाजातील मुलांचे हक्क, गरज आणि आवाज अधोरेखित करतो. चाचा नेहरूंचा वारसा राष्ट्राला असे वातावरण निर्माण करण्याची आठवण करून देतो की, जेथे प्रत्येक लहान मूल हे भरभराट करू शकेल आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहचू शकेल. बाल दिवस हा शिक्षण आणि विकासाला चालना देऊन, बालदिन हा एक स्मरण करून देतो की, आज मुलांमध्ये केलेली गुंतवणूक ही भारताच्या चांगल्या भविष्याचा पाया घालते. जी त्यांना भविष्यात सक्षम, सशक्त नागरिक बनू देते .
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…