Friday, December 1, 2023

Latest Posts

१५-२० लाखांचं बजेट आहे? तर ‘या’ कार आहेत तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन

१५-२० लाखांचं बजेट आहे? तर 'या' कार आहेत तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन

कार खरेदी करण्याआधी सगळ्यात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे बजेटचा, पण तुमचं बजेट जर १५-२० लाखांपर्यंतचं असेल आणि तुम्हालाही १५ ते २० लाखांत चांगली डिझेल एसयूव्ही घ्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला ५ उत्तम पर्याय सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी अधिक चांगले राहतील. कालांतराने डिझेल गाड्यांची संख्या कमी होऊन, इलेक्ट्रिक गाड्या सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत. असं असलं तरीही दमदार एसयूव्हीची आवड असणाऱ्यांमध्ये डिझेल वाहनांची क्रेझ अजूनही लोकांमध्ये कायम आहे.

या कारणास्तव, टाटा मोटर्स, महिंद्रा, एमजी मोटर, जीप आणि ह्युंदाई मोटर्स सारख्या कंपन्या अजूनही चांगल्या डिझेल एसयूव्ही बनवतात आणि त्यांची विक्रीही चांगल्या प्रमाणात होते . १५ लाख ते २० लाख किंमतीच्या रेंजमधील SUV खरेदी करणार्‍या ग्राहकांना चांगले फीचर्स आणि चांगले इंधन असलेल्या ५ डिझेल एसयूव्हीबद्दस आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. टाटा हॅरियर(TATA HARRIER)-

टाटा मोटर्सने अलीकडेच लाँच केलेली SUV Harrier फक्त डिझेल इंजिन पर्यायात येते आणि तिची एक्स-शोरूम किंमत १५.४९ लाख रुपये इतकी आहे. अपडेटेड (Updated) केबिन आणि मोठ्या इंफोटेनमेंट सिस्टीमसह अनेक फीचर्ससह (Features) स्ट्राँग बिल्ड क्वॉलिटी आणि आकर्षक डिझाइनमुळे टाटा हॅरियर डिझेल एसयूव्ही खरेदीदारांच्या मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

२. महिंद्रा (Mahindra XUV700 MX) डिझेल-

Mahindra XUV700 ही कार महिंद्राची सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. याची एक्स शोरुम किंमत १४.४७ लाख रुपये इतकी आहे. याचे इंजिन,फीचर्स फारच चांगले आहे आणि या कारचा लूक देखील दमदार आहे.

३. एमजी हेक्टर(MG Hector) शाइन डिझेल-

एमजी हेक्टर(MG Hector) शाइन याच्या डिझेल व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत १७.९९ लाखांपासून सुरु होते. MG Hector डिझेल २.०L टर्बोचार्ज्ड इंजिनद्वारे समर्थित आहे, जे ३५०Nm चा पीक टॉर्क जनरेट करते तसेच हेक्टर ११ ADAS फीचर्ससह १४ -इंच एचडी पोर्ट्रेट (HD Potrait) इंफोटेनमेंट सिस्टम, ७५ हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स, सेगमेंट सर्वोत्तम i-Smart तंत्रज्ञान, इंटेलिजेंट ऑटो टर्न इंडिकेटर आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारखे अनेक फीचर्स यात उपलब्ध आहेत.

४.Hyundai Alcazar Prestige ७ -सीटर डिझेल-

Hyundai Alcazar Prestige, ७ सीटर डिझेल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १७.७३ लाख रुपये इतकी आहे. Hyundai Alcazar Prestige ७ सीटर २०. kmpl च्या मायलेजसह(Mielage) १.५ डिझेल लिटर इंजिन तसेच मॅन्युअल ट्रान्समिशनसह(Manual Transmission) ही गाडी ३ रांगांमध्ये उपलब्ध आहे.

५. जीप कंपास (Jeep Compass)-

जीप कंपास Jeep Compass फक्त डिझेल इंजिन या पर्यायात आहे. जीप कंपास लाइनअपमधील बेस मॉडेल कंपास स्पोर्ट २.० ची एक्स-शोरूम किंमत २०.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. जीप कंपास स्पोर्ट Jeep Compass Sport २.० डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन असून ही गाडी ५ रांगांमधेय उपलब्ध आहे.

हे ही वाचा : 

शाहरुख खानचा ‘डंकी’चा टीझर प्रदर्शित,नव्या लुकची चर्चा

IND vs SL, टीम इंडियाला आज सेमी फायनलचे तिकीट मिळणार! विजय निश्चित का मानला जातो घ्या जाणून…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss