spot_img
spot_img

Latest Posts

मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली आहे. तर काही राज्यात अजून पावसाची प्रतीक्षा आहे.

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली आहे. तर काही राज्यात अजून पावसाची प्रतीक्षा आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये मुसळधार पाऊस पडत आहेत. मध्य प्रदेशमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे विकट परिस्थिती निर्मण झाली आहे. त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य प्रदशमध्ये मोठ्या प्रमाणवर पाऊस पडत आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तेथील जनजीवन सुद्धा विस्खलीत झाले आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. तर काही भागात दुकानात आणि घरात पाणी शिरले आहे. मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. या पडणाऱ्या पावसामुळे गाड्या वाहून गेल्या आहेत. तर आज मध्य राज्यातील काही जिह्ल्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १७ सप्टेंबर राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दिल्लीमध्ये हवामानात बदल झाला आहे. हवामानात बदल झाल्यामुळे काही भागात मध्यम तर तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. तापमानात देखील बदल झाला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर १९ आणि २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरणाची शक्यता देण्यात आली आहे. याशिवाय उत्तराखंडमध्येही २० सप्टेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातही मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ,राज्यात आज (१७ सप्टेंबर) मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्येही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजस्थानच्या उदयपूर आणि कोटा विभागात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss