Monday, November 20, 2023

Latest Posts

विशाखापट्टणम Fishing Harborमध्ये भीषण अपघात, बोटीचा सिलेंडर फुटला अन्…

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात असलेल्या फिशिंग हार्बरमध्ये सोमवार दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी एक मोठी दुर्घटना घडली.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात असलेल्या फिशिंग हार्बरमध्ये सोमवार दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी एक मोठी दुर्घटना घडली. येथील मासेमारी बंदरात भीषण आग लागल्याने बंदरात उभ्या असलेल्या २५ यांत्रिक मासेमारी नौका जळून खाक झाल्या. रविवारी रात्री उशिरा लागलेली आग सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होती. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बोटी जळताना दिसत आहेत.

आग लागल्यानंतर बंदरावर उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छीमारांनी तातडीने स्थानिक पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. मच्छिमारांनी सांगितले की, आग एका बोटीतून लागली, ती काही वेळातच इतर बोटींमध्ये पसरली. आग लागलेल्या बोटीच्या आजूबाजूला इतर बोटी नांगरल्या गेल्याने आग वेगाने पसरली. त्यामुळे आग वेगाने पसरण्यास मदत झाली. बहुतांश बोटी लाकडाच्या होत्या किंवा त्यामध्ये प्लास्टिक असल्याने आग आणखी पसरली.

या आगीच्या घटनेमागे एलपीजी सिलिंडरचा हात आहे. बोटींवर ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरमध्ये मोठा स्फोट झाला. त्यामुळे गोंधळ उडाला. सिलिंडर फुटल्याचा आवाज दूरवर ऐकू आला. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली, ज्यामुळे २५ बोटी काही वेळातच नष्ट झाल्या. मात्र, एलपीजी सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला हे समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिस उपायुक्त के आनंद रेड्डी यांनी सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चारहून अधिक अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या आगीमुळे सुमारे ४० मासेमारी नौकांचे नुकसान झाल्याचे मच्छिमारांनी सांगितले. प्रत्येक बोटीची किंमत किमान ४० लाख रुपये होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आगीचे नेमके कारण शोधून काढू, असे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

हे ही वाचा : 

क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर बोलताना संजय राऊतांची टोलेबाजी

WORLDCUP 2023: टीमला ORIGINAL ट्रॉफी मिळते का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss