Wednesday, November 29, 2023

Latest Posts

सर्वांना आवडणारी ही जिलेबी भारतात कशी आली?

आपल्या देशात प्रत्येक सणाला, लग्न कार्याला किंवा आनंदाच्या ठिकाणी आवर्जून गोड पदार्थाला मान हा दिला जातो. तर गोड पदार्थ म्हंटल कि सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती ती जिलेबी.

आपल्या देशात प्रत्येक सणाला, लग्न कार्याला किंवा आनंदाच्या ठिकाणी आवर्जून गोड पदार्थाला मान हा दिला जातो. तर गोड पदार्थ म्हंटल कि सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती ती जिलेबी. जिलेबी हे असं पक्वान्न आहे जे आवडत नाही असा माणूस विरळच. गरम गरम जिलेबी तर प्रत्येक जण आवडीने खातात. आता जर आपण लग्न कार्य किंवा एखाद्या इव्हेंटचा विचार केला तर तिथे पंगतीच्या जेवणाची जागा बुफे आणि लाईव्ह काऊंटर्सनी घेतली आहे. सगळं काही हळू हळू बदलत आहे परंतु जेवणाच्या मेनुमधील जिलेबीची जागा मात्र अजूनही कोणी घेऊ शकलं नाहीय. म्हणजे काय तर जिलेबीचं महत्त्व काही कमी झालेलं नाही. मात्र हि जिलेबीभारतात कशी आली? माहिती आहे का?

सर्व भारतीयांना आवडणारं हे पक्वान्न मुळात भारतातलं नाहीच. जिलेबी भारतात आली त्याला ५०० वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र या जिलेबीची रंगत आणि लज्जत वाढतानाच दिसते आहे. जिलेबीचा आणखी एक प्रकार प्रसिद्ध आहे तो म्हणजे इमरती. इमरती आवडणारेही लोक खूप आहेत. त्याचप्रमाणे जिलेबी ही मैद्यापासून तयार केली जाते आणि साखरेच्या पाकात घोळवली जाते. पिवळीधम्मक किंवा केशरी जिलेबी पाहिली की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.

चौदाव्या शतकात जिलेबीचं आगमन आपल्या देशात झालं. पामिरन साम्राज्यातल्या झलाबिया या शहरावरुन या पदार्थाला जिलेबी हे नाव पडलं. झलबिया शहरातल्या एका हलवायाने मैद्यात यिस्ट घालून आंबवलेल्या पिठात अंडी मिसळली आणि त्याची गोलाकार बिस्किटं तयार करुन त्यावर मध ओतलं. या पदार्थाला त्या हलवायाने नाव दिलं झलाबिया. झलाबिया हे शहर पामिरन साम्राज्याची राणी झेनोबियाने वसवलं होतं. पुढे हे साम्राज्यही लयाला गेलं आणि तिने वसवलेलं शहरही. पण झलाबिया हा पदार्थ राहिला. जो नंतर अरबास्तानात गेला. अरबास्तानात झलाबियाला जलबिया असं म्हटलं गेलं. त्यानंतर जिलेबी हे नाव धारण करुन हा पदार्थ भारतात आला तो अरबस्तानातून. तर असा आहे या जिलेबीचा इतिहास.

जिलेबीची इतर नावं काय? –

झेपली, जिलापी, जिलापीर पाक, जिलाफी, जुलबिया, जेरी, मुराब्बक, कुंडलिका, जलबल्लिका, चासवल्लिका, जलेबा, झलेबिया, जलेबा, जिलबी, जलेबी असंही आपल्या पिवळ्याधम्मक किंवा केशरी जिलेबीला म्हणतात.

हे ही वाचा : 

Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व

Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss