spot_img
spot_img

Latest Posts

लहान मुलांसाठी गॅसचा फुगा घेताय, तर ही बातमी नक्की वाचा…

बरीच लहान मुलं फुगे पाहून आकर्षित होतात. त्याचे आई वडील देखील त्यांना लगेच फुगे घेऊन देतात.

बरीच लहान मुलं फुगे पाहून आकर्षित होतात. त्याचे आई वडील देखील त्यांना लगेच फुगे घेऊन देतात. फुग्यांचा वापर खेळण्यासाठी, डेकोरेशन करण्यासाठी केला जातो. पण हाच गॅस भरलेला फुगा आरोग्यासाठी किती धोकादयाक आहे हे तुम्हाला माहित आहे का ? या संदर्भातील जराही अंदाज पालकांना नसतो. लहान मुलांना फुगे खेळायला देताना सावधगिरी बाळगण्याची गरज असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. सोशल मीडियावरचा हा विडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

सध्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये हेलियम वायूने भरलेली खेळणी किती धोकादायक असतात हे दाखवण्यात आले आहे. मुख्यता फुग्यांमध्ये हेलियम वायू भरलेला असतो. हेलियम हा वायू हलका असल्यामुळे तो फुग्यासोबतच इतरही खेळण्यांमध्ये वापरला जातो. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये हेलियम वायूच्या फुग्यामुळे आई आणि मुलाला किती त्रास सहन करावा लागला हे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलासोबत दिसत आहे. त्या लहान मुलाच्या हातात हेलियम वायूने भरलेला बॉल आहे. आई तिच्या कामात असते. आणि खेळता खेळता ते मुलं आईकडे जाते आणि हातातील बॉल आईच्या दिशेने फेकतो. तेवढ्यात चेंडू सरळ जाऊन ड्रायरला आदळतो आणि उष्णतेच्या वाफेमुळे तो चेंडू फुटतो. चेंडू फुटताच घरात मोठ्या प्रमाणावर आग लागते.

सोशल मीडियावरील या व्हिडिओला कॅपेंशन दिले आहे. ‘ हेलियम हा वायू ज्वलनशील नसतो. पण काहीवेळा त्याच्यामध्ये इतरही वायू मिक्स केलेले असतात. त्यामुळे काहीवेळा फुगा किंवा चेंडू फुटण्याची शक्यता असते. हेलियम हा वायू सुरक्षित मानला जातो. पण सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पाहून आपण सावधगिरी बाळगणं गरजेचे आहे.

Latest Posts

Don't Miss