Thursday, April 18, 2024

Latest Posts

Important Days in June, हे आहेत जून महिन्यातील म्हत्वाचे दिवस, जाणून घ्या एका क्लिकवर

जून महिना चालू झाला की पावसाची चाहूल लागते. याच महिन्यात रिमझिम पावसाला सुरुवात होते. खरंतर जून महिना हा मुलांसाठी/विद्यार्थ्यांसाठी खास असतो. त्याचे कारण असे कि या जून महिन्यात सर्व शाळा, महाविद्यालये चालू होतात.

जून महिना चालू झाला की पावसाची चाहूल लागते. याच महिन्यात रिमझिम पावसाला सुरुवात होते. खरंतर जून महिना हा मुलांसाठी/विद्यार्थ्यांसाठी खास असतो. त्याचे कारण असे कि या जून महिन्यात सर्व शाळा, महाविद्यालये चालू होतात. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत याच जून महिन्यात साजरे केले जाणारे सण आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले महत्वाचे दिवस आणि सोबतच आम्ही त्या सणाची आणि महत्वाच्या दिवसाची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय?

१ जून २०२३: जागतिक दूध दिन (World milk day)

जागतिक दूध दिवस हा संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना यांच्या तर्फे संपूर्ण जगभरात १ जून रोजी साजरा केला जातो. जागतिक दूध दिन या महत्वाच्या दिवसाची सुरुवात ही २००१ सालापासून सुरु झाली. दुधाचा समावेश हा जागतिक खाद्यपदार्थांमध्ये केला जात असून या दिवशी जागतिक पातळीवर दुधाचे महत्व दर्शविले जाते. आपल्या आरोग्यासाठी असलेली दुधाची आवश्यकता व त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम या दिवशी केले जाते.

२ जून २०२३: संत निवृत्तीनाथ पालखी (Saint Nivruttinath Palkhi)

संत निवृत्तीनाथ महाराजांची आषाढी वारी पालखी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून २ जून रोजी दुपारी २ वाजता प्रस्थान होणार आहे.

२ जून २०२३: आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन (International Sex Workers’ Day)

युरोपसह जगभरात हा दिवस २ जून रोजी पाळला जातो. २ जून हा आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन म्हणून ओळखला जातो कारण २ जून १९७५ रोजी, सुमारे १०० लैंकिंग कामगारांनी संत-निझियर चर्चवर कब्जा करून त्यांच्या शोषणशील राहणीमान आणि कामाच्या परिस्थितीचा निषेध केला. ल्योन, फ्रान्स मध्ये. पोलिसांनी १० जून रोजी अत्यंत भयानक पद्धतीने चर्चवर छापा टाकला. हे कृत्य आज जागतिक स्तरावर आणि युरोपमध्ये मान्यताप्राप्त राष्ट्रीय चळवळ बनले आहे.

२ जून २०२३: तेलंगण निर्मिती दिवस (Telangana Formation Day)

या दिवशी म्हणजेच २ जून २०१४ साली भारतातील तेलंगणा हे राज्य आंध्र प्रदेश या राज्यापासून अधिकृतपणे वेगळे घोषित करण्यात आले. हा दिवस तेलंगणा राज्यातील लोकांसाठी महत्वाचा दिवस असून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी तेलंगणा राज्यात मोर्चा काढला जातो. तेलंगणा राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

३ जून २०२३: वटपौर्णिमा (Vatpournima)

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मीय सण आहे. या दिवशी अनेक विवाहित स्त्रिया या वट सावित्रीचे व्रत पाळतात. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने आपल्या पतीला उत्तम आयुष्य लाभते तसेच वैवाहिक जीवन सुखी होते. या दिवशी विवाहित बायका वडाच्या झाडाची पूजा करतात.

३ जून २०२३: जागतिक सायकल दिन (World Bicycle Day)

संयुक्त राष्ट्र महासभेने ३ जून हा आंतरराष्ट्रीय जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला. वाहतुकीचे साधन म्हणून सायकलची अनुकूलता आणि पर्यावरण मित्रत्व या बद्दल सांगण्यात येते तसेच या गोष्टीचे लोकांना महत्व पटवून दिले जाते.

४ जून २०२३: कबीर जयंती (Kabir Jayanti)

कबीरदास हे महान संत आणि कवी होते. कबीरदासांचे दोहे या जगात प्रचंड प्रसिद्ध आहेत. संत कबीर ज्ञानाच्या गोष्टी आपल्या दोह्यांमधून लोकांना सांगत असत. संत कबीर दास समाजसुधारक होते. समाजातील विकृती सुधारण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. संत ककबिर डासांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

४ जून २०२३: आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Innocent Children Victims of Aggression)

दरवर्षी ४ जून रोजी जगभरातील लोक “आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस” ​​म्हणून साजरा करतात. शारीरिक, मानसिक किंवा भावनिक हल्ला असो त्याचबरोबर गुंडगिरीचा अनुभव घेतलेल्या मुलांच्या दुर्दशेबद्दल सार्वजनिक जागरूकता वाढवण्याचा या दिवसाचा हेतू आहे .

५ जून २०२३: जागतिक पर्यावरण दिवस (World Environment Day)

जागतिक पर्यावरण दिन हा जून २०२३ मधील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. हा दिवस जगभरात आपल्या पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्याच वेळी पर्यावरण प्रदूषण आणि ऱ्हासाच्या विरोधात बोलण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस जगभरात साजरा केला जात असून या दिवशी बऱ्याच पर्यावरणाच्या संरक्षणाशी तसेच संवर्धनाशी निगडित वेगवेगळ्या कर्यक्रमाचे आयोजन केले जाते.

५ जून २०२३: गुरु हरगोविंदसिंह जयंती (Guru Hargovind Singh Jayanti)

गुरु हरगोविंद जी यांचा जन्मदिवस, ज्यांना प्रकाश गुरू हरगोविंद म्हणूनही ओळखले जाते, हा उत्तर भारतातील एक प्रादेशिक उत्सव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिखांनी मुघल राजवट आणि सैन्याविरुद्ध अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या. त्यांचे जीवन आणि शिकवण लक्षात ठेवून त्यांची जयंती साजरी केली जाते. हा एक शीख सण आहे जिथे देशभरातील गुरुद्वारांमध्ये अनेक विशेष सभा अथवा मेळावे आयोजित केले जातात.

६ जून २०२३: शिवराज्याभिषेक दिन (Coronation Day of Chhatrapti Shivaji Maharaj)

या दिवशी म्हणजेच ६ जून १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला होता. हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाला प्रेरणा देणारा, प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे. अशा दिवसाचे महत्त्व अधिक दृढ करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ६ जून हा दिवस ‘शिवराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

६ जून २०२३: जागतिक कीटक दिन (World Pest Day)

६ जून रोजी जागतिक कीटक दिन साजरा केला जातो. सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी कीटक संघटना खूप महत्त्वाची भूमिका बजावतात कारण पावसाळ्यात कीटकांची समस्या अधिक गंभीर होते त्याचे कारण म्हणजे ते अनेक रोगांना जन्म देतात. याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

७ जून २०२३: संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi)

७ जून रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी गणेश भक्त संपूर्ण दिवस उपवास करून गणपतीची आराधना करतात. गणपती बाप्पाची पूजा करून योग्य वेळी चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून गणेश भक्त आपला उपवास सोडतात.

७ जून २०२३ जागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day)

जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा ७ जून २०१९ रोजी प्रथमच साजरा करण्यात आला. अन्न सुरक्षा मानके राखण्यासाठी आणि अन्नजन्य आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

१० जून २०२३: जागतिक दृष्टीदान दिन (World Eye Donation Day)

प्रत्येक वर्षी १० जून रोजी जागतिक दृष्टिदान हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सर्वत्र नेत्रदानाबद्दल जनजागृती केली जाते. नेत्रदानाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा जागतिक दृष्टीदान दिनाचा उद्देश आहे.

१२ जून २०२३: जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस (World Day Against Child Labour)

बालमजुरी ही समाजातील एक सततची वाईट गोष्ट आहे आणि बालमजुरीविरुद्धचा जागतिक दिवस त्याविरुद्ध कारवाई करण्याची लोकांनां प्रोत्साहित करतो. बालमजुरी संपवण्याचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा 2002 मध्ये स्थापन करण्यात आला.

१४ जून २०२३: जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day)

दरवर्षी १४ जून रोजी रक्तदान आणि रक्तदात्यांच्या जागृतीसाठी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. सर्व रक्तदात्यांनी चांगल्या कारणासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना देखील ओळखले.

१४ जून २०२३: संत निवृत्तीनाथ यात्रा (Saint Nivrittinath Yatra)

श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे आयोजन नाशिक जवळ त्र्यंबकेश्वरमध्ये केले जाते. दरवर्षी लाखो वारकरी संत निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला भेट देतात.

१५ जून २०२३: संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी (Saint Nivrittinath’s death anniversary)

संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या त्रंबकेश्वर येथील यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे १५ जून रोजी संत निवृत्तीनाथ महाराजांची पुण्यतिथी आहे.

१७ जून २०२३: राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी (Death anniversary of Rajmata Jijausaheb Bhosale)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रम रुजवणाऱ्या राजमाता जिजाऊंची १७ जून ही पुण्यतिथी आहे.

१७ जून २०२३: गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी

गोपाळ गणेश आगरकर महाराष्ट्रातील एक विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. महाराष्ट्राच्या इतिहासात आगरकरांचे सामाजिक प्रबोधनातील योगदान मोलाचे आहे. गोपाळ गणेश आगरकरांची पुण्यतिथी हि १७ जून रोजी आहे.

१८ जून २०२३: जागतिक पितृदिन (World Father’s Day)

फादर्स डे (Fathers day) हा जूनमधील सर्वात खास दिवसांपैकी एक मानला जातो. हा दिवस जगभरातील सर्व वडिलांसाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या दिवशी, मुले भेटवस्तू, हस्तनिर्मित कार्ड इत्यादी टोकन देऊन त्यांच्या वडिलांबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त करतात.

१८ जून २०२३: झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी (Death anniversary of Rani Lakshmi Bai of Jhansi)

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे व मोलाचे योगदान आहे. अशा शूर राणीला संपूर्ण देशात अभिवादन त्यांच्या पुण्यतिथीला अभिवादन केले जाते.

१९ जून २०२३: महाकवी कालिदास दिन (Mahakavi kalidas din)

आषाढ शुक्ल प्रतिपदा हा कालिदास यांचा जन्मदिवस असल्याने हा दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृत कवी आणि संगीतकार, नाटककार होते.

२० जून २०२३: जागतिक निर्वासित दिन (World Refugee Day)

दरवर्षी २०जून रोजी जगभरातील लोक निर्वासितांचे स्मरण करतात. सर्व निर्वासितांना श्रद्धांजली वाहतात तसेच त्यांच्या दुर्दशेबद्दल जगभरात जागरुकता पसरवितात.

२१ जून २०२३: आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day)

आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात सर्वत्र साजरा केला जातो. जगभरातील लोकांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे मान्यता दिल्यानंतर २०१५ मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. योगाची उत्पत्ती भारत हे ठिकाण असल्याने, देशात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक जागोजागी एकत्रित येऊन योगा करून हा दिवस साजरा करतात.

२१ जून २०२३: जागतिक संगीत दिन (World Music Day)

जागतिक संगीत दिन हा संगीताचा एक सुंदर उत्सव आहे जिथे प्रत्येकाला वाद्य उचलून ते वाजवण्यास प्रोत्साहित केले जाते.

२२ जून २०२३: विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi)

हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. चतुर्थी तिथी ही गणपतीला समर्पित आहे. अमावस्येनंतर येणारी चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते.

२६ जून २०२३: छत्रपती शाहू महाराज जयंती (chhatrapati Shahu Maharaj Jayanti)

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ही २६ जून रोजी आहे. ब्रिटिश राजवटीत शाहूराजांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण सामाजिक उन्नतीसाठी अथक प्रयत्न केले.

२९ जून २०२३: देवशयनी आषाढी एकादशी

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो वारकरी भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पायी चालत. या दिवशी लाखो भक्त उपवास करून विठ्ठल रखुमाईची उपासना करतात. आषाढी एकदशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची आठशे वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून पंरपरा सुरु आहे असे मानले जाते.

२९ जून २०२३: बकरी ईद (Bakri eid)

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानली जाणारी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद २९ जून रोजी देशभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे

हे ही वाचा : 

बनवा नारळाच्या मलाईची खीर, पचनास अगदी हलकी!

हॉटेल स्टाईल Crispy Chili Chicken बनवा घरच्या घरी…

अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्यातून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss