spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

INCOME TAX: कॅलेंडरमधून जाणून घ्या अंतिम तारखा

२०२२ आणि २३ या आर्थिक वर्षात उद्यम भांडवल कंपनीने कमावलेले रकमेचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे यासाठी करदात्यांना फॉर्म क्रमांक ६४ भरावा लागणार आहे.

कर दात्यांच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात कर दात्यांना कर संबंधित अनेक कामे पूर्ण करावी लागणार आहेत. यासाठी कोणत्याही समस्या येऊ नयेत या दृष्टीने प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कर संबंधित अनेक महत्त्वाच्या कामांना नोव्हेंबर महिन्यात देय तारखा देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या तारखांबाबत आयकर विभागाचे टॅक्स कॅलेंडर जारी करण्यात आले आहे. कर दात्यांसाठी आयकर संदर्भातील महत्त्वाच्या कामांच्या मुदती काय असणार आहेत, हे आपण जाणून घेऊया. ऑक्टोबर महिन्यात कपात केलेला किंवा गोळा केलेला कर जमा करण्याची अंतिम मुदत सात नोव्हेंबर २०२३ रोजी संपणार आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयाने कापून घेतलेला कर, हा ज्या दिवशी भरला जाईल त्या दिवशी सरकारी खात्यात जमा होईल यासाठी आयकर चलनाची गरज भासणार नाही.

नोव्हेंबर २०२३ या महिन्यासाठी कपात केलेल्या टीडीएसचे (TDS) टीडीएस प्रमाणपत्र (TDS CERTIFICATE) मिळवण्याची अंतिम मुदत १४ नोव्हेंबर २०२३ रोजी संपणार आहे. या विभागाअंतर्गत टीडीएस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही टॅक्स सारखी पूर्वी अर्ज करावा. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अजूनही टीडीएस प्रमाणपत्र सादर केले नसेल तर, कर दात्यांकडे १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंतची मुदत आहे हे टीडीएस प्रमाणपत्र वेतना व्यतिरिक्त इतर करांसाठी आहे. ऑक्टोबर महिन्यात चलनाशिवाय जमा केलेला टीडीएसचा फॉर्म २४ जी सबमिट करण्याची अंतिम तारीख देखील १५ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. कर दात्यांना फॉर्म नोव्हेंबर थ्री बीबी मधील स्टेटमेंट स्टॉक एक्सचेंजमध्ये सबमिट करावी लागणार आहे, ज्यामध्ये क्लायंट कोड नमूद केला आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये चलन तपशील सबमिट करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे. जर कोणतेही विशेष देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार जर करदात्यांनी केले असतील, तर मूल्यांकन वर्ष २०२३ आणि २४ साठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर रोजी आहे. २०२२ आणि २३ या आर्थिक वर्षात उद्यम भांडवल कंपनीने कमावलेले रकमेचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यासाठी करदात्यांना फॉर्म क्रमांक ६४ भरावा लागणार आहे. सुरक्षित बंदर नियम अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी थ्री सीइएफए सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

हे ही वाचा : 

छत्तीसगडच्या भाजपचा जाहीरनामा, सरकारी नोकऱ्या मिळणार

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss