Wednesday, November 22, 2023

Latest Posts

भारताच्या लसूण निर्यातीत वाढ, नेमकं प्रकरण काय?

भारताच्या लसूण निर्यातीत वाढ, नेमकं प्रकरण काय?

आपल्या खाण्यापिण्याच्या रोजच्या वापरात खाल्ला जाणारा ‘लसूण’ दोन देशामधील युद्धाला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. हे युद्ध दारू- गोळ्यांचं युद्ध नसून लसूण व्यवसायाबद्दल बोलत आहोत. लसूण निर्यातीत भारत हा सातत्याने वर झेप घेत आहे. त्यामुळं आता चीनच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. जगभरातील लसणाच्या व्यापारी बाजरात चीनची बरोबरी करणारा कोणताही देश नाही. पण आता चीनला या आघाडीवरही भारत मात देत आहे. भारताचा लसूण व्यापार सातत्याने वर जात आहे ज्यमुळे चीनच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे. यादरम्यान, चीनने आता ब्लिच कलेला लसूणही टाकण्यास सुरुवात केली आहे. सध्या जगात लसणाच्या निर्यातीच्या आघाडीवर चीन अजूनही जगात अव्वल स्थानावर आहे. चीनने एकेकाळी जगात ८०% लसणाची निर्यात केली होती जी अलीकडे ७०-७५ टक्क्यांपर्यंत खाली आलेली आहे तसेच भारताच्या लसूण निर्यातीत वाढ झालेली आहे.

जगभरातील मसाल्यांच्या व्यापारात भारत हा जगातील आघाडीचा देश आहे. प्राचीन काळापासून मसाल्यांच्या व्यापारमार्ग भारतातून जात होता. मागील वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली तर भारतातील मसाल्यांच्या निर्यातीत लसणाचा वाट हा झपाट्याने वाढत चालला आहे. स्पाईस बोर्डच्या (Spice board) आकडेवारीनुसार, २०२२ ते २०२३ च्या एप्रिल ते जानेवारी या अवघ्या १० महिन्यांत लसणाच्या निर्यातीत १६५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या कालावधीत भारताने ४७,३२९ टन लसणाची निर्यात केली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात ही निर्यात ५७३४६ टन इतकी होती, जी २०२१-२२ च्या तुलनेत १५९ टक्के इतकी अधिक होती.

भारतात एकूण ३२ लाख टन इतका लसूण पिकतो

भारतात दरवर्षी सुमारे एकूण ३२ लाख टन इतका लसूण पिकतो. भारतातल्या लसणाचे सर्वाधिक उत्पन्न मध्यप्रदेश या राज्यात होतं. मात्र चीनमध्ये लसणाचे उत्पादन घट होऊनही जगात पहिल्या क्रमांकावर स्थिर आहे. चीनमध्ये दरवर्षी सुमारे २ ते २५ दशलक्ष टन इतक्या लसणाचे उत्पादन केले जाते, जरी दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा व्यापार देशांतर्गत केला जातो.

हे ही वाचा : 

शहनाज गिलचा लाल रंगाच्या ड्रेसमधील हॉट लूक

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणी पुन्हा गेली लांबणीवर, नार्वेकरांसमोर शिंदे-ठाकरे गट ई मेलवरुन भिडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss