कॅनडानं (Canada) भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची (Hardeep Singh Nijjar) हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर उच्च भारतीयाला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅनडाने केलेल्या आरोपाला भारताने देखील जशास तसे उत्तर दिले आहे. कॅनडाच्या राजदूताला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून आदेश देण्यात आले आहेत. पुढच्या 5 दिवसांत कॅनडाच्या राजदुताला भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं वक्तव्य केलं आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली.त्यावेळी कॅनडाच्या पंतप्रधानांनी थेट भारतावर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही तशीच वक्तव्य केली. त्यानंतर भारताने वक्तव्य करून निवेदन देऊन आरोप फेटाळून लावले आहेत. कॅनडानं केलेला हत्येचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं भारतानं म्हटलं आहे. कॅनडाच्या वतीनं करण्यात आलेल्या आरोपांनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं एक निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. परराष्ट्रानं म्हटलं आहे की, कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज पाचारण करण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की, भारतानं नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ कॅनेडियन राजदुताला देश सोडण्यास सांगण्याचा निर्णय घेतला आहे. राजदुताला पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं आहे की, “हा निर्णय कॅनडाच्या राजदुताचा आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग यावर भारत सरकारची वाढती चिंता प्रतिबिंबित करतो.
हरदीप सिंह निज्जर हे बंदी घातलेल्या फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित असल्याचे समजले आहे. गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्यानंतर ते या गटाचे दुसरे होते. 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर हा जालंधरच्या भारसिंह पुरा गावाचा रहिवाशी होता. पण कालांतरानं तो खलिस्तानी कारवायांमध्ये सामील झाले.
हे ही वाचा:
लतादीदी यांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याची मागणी
राजू शेट्टी यांनी केली सरकारवर टीका