spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Odisha Train Accident, २००४ नंतर जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात, २३३ लोकांचा मृत्यू तर…

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला.

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. या भीषण अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच काल रात्रीपासून मोठ्या शर्तीने बचावकार्य हे सुरु आहे.

या आधी जगातील सर्वात मोठी रेल्वे दुर्घटना श्रीलंकेत घडली. दिनांक २६ डिसेंबर २००४ रोजी ‘ओशन क्वीन एक्स्प्रेस’मधील सुमारे १७०० लोकांचा मृत्यू झाला होता. त्सुनामीमुळे झालेल्या अपघातामुळे पुरीची संपूर्ण ट्रेन त्सुनामीच्या जोरदार लाटांमध्ये विलीन झाली होती. या अपघातामुळे अनेक लोक बेघर तर अनेक अनाथ झाले होते. या मोठ्या अपघातानंतर काल रात्री झालेला अपघात हा जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. सध्या मोठ्या शर्तीने मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

सायंकाळी ७.२० च्या सुमारास बालासोर रेल्वे अपघात घडला. रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूहून हावडाकडे जाणाऱ्या १२८६४ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहनगा मार्केटमध्ये अचानक रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर पडले. ट्रेनचे डबे दुसऱ्या रुळावरून येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस १२८४१ ला धडकले. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मालगाडीला धडकले. मिळालेल्या माहितीनुसार हावडा पासून २५५ किमी अंतरावर बहंगा बाजार स्टेशनवर हा अपघात झाला. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या अपघातानंतर रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मदत निधीलाही मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत देण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss