spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय !

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात ९ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला गेला. भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेटच्या महामुकाबल्यात अखेर टीम इंडियाचा विजय झाला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात ९ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला गेला. हा सामना दोन्ही संघांसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. या सामना दरम्यान भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेटच्या महामुकाबल्यात अखेर टीम इंडियाचा विजय झाला आहे.

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ६ विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान पटकावला आहे. भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद असून यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.

न्यूझीलंड टीम इंडियाला विजयासाठी २५२ धावांचं आव्हान दिलं होत. टीम इंडियाने ते आव्हान पेलवत ६ विकेट्स गमावून ४९ ओव्हरमध्ये पूर्ण केलं आहे. टीम इंडियाने २५४ धावा केल्या . त्याचबरोबर टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा हिशेब चुकता केला म्हणायला आता काही हरकत नाही….

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss