महागाईचा फटका जगभरातील सर्वच देशांना बसत आहे. या महागाईचा फटका जास्त भारता शेजारी असलेल्या पाकिस्तानला बसला आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप बेताची होत चाली आहे. त्यामुळे जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. तसेच आता पाकिस्तानमध्ये सरकारने इंधनाच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनतेला मोठा फक्त बसतो आहे.कोरोना काळानंतर सर्वच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला. बेरोजगारी मोठ्या संख्येने निर्माण झाली.
पाकिस्तानच्या सरकारने पेट्रोलमध्ये २६ रुपये २ पैशानी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत १७ रुपये ३४ पैशांनी वाढ झाली आहे.या वाढत्या महागाईचा तेथील जनतेला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातील जनतेला महागाईचा सामान करावा लागत आहे. पाकिस्तानच्या सरकारने जनतेला महागाईपासून दिलासा देणार असल्याचं आश्वासन दिले आहे. मात्र वस्तुंच्या किमती कमी होत नसून महाग होत आहेत. गेल्या आठवड्यात आर्थिक समन्वय समितीने (ECC) पेट्रोलियम डीलर्स आणि तेल विपणन कंपन्यांनी किंमत वाढवण्यास परवानगी दिली आहे. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री मार्जिनमध्ये प्रति लिटर ३. ५ रुपयांनी वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारने इंधनाच्या दरात वाढ केल्यानंतर पेट्रोलचे नवे दर प्रतिलिटर ३३१ रुपये ३८ पैसे झाले आहेत. तर डिझेलचे दर ३२९ रुपये १८ पैसे प्रति लिटर झाले आहे.ईसीसीने पेट्रोल आणि डिझेल विक्री मार्जिनमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिल्यामुळे यानंतरच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जागितक स्तरावर पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असल्याचे सरकारने सांगितले आहे.
पाकिस्तान या देशाला मागील काही वर्षपासून महागाईचा सामना करावा लागत आहे. रोजच्या वापरातील काही किरकोळ वस्तूंचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आयएमएफच्या बेलआउट फंडातून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी महागाईत फारसा फरक पडलेला नाही. पाकिस्तानातील महागाई २ अंकांनी वाढली आहे. पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने अन्नधान्य महागाई दर ३८. ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये तो ६.२ % होता.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला
नाशिक मधील काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा