वंदे भारत रेल्वे हे नेहमीच चर्चेत असते आपल्या प्रवासामुळे. आलिशान प्रवास, सर्व सोयीसुविधा असलेली ही रेल्वे आहे. मात्र याच रेल्वेतील एक किळसवणा विडिओ समोर आला आहे. हि घटना समजताच रेल्वे विभागानेही मोठा निर्णय घेतला आहे.
तिरुनेलवेली ते चेन्नई अशा प्रवासाला निघालेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये हा प्रकार आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करतांना रेल्वेत मिळणाऱ्या अन्नात किडे आढळले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि सोशल मीडियावर वेगवेळ्या प्रतिक्रिया येत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक काळ्या रंगाचा किडा सांबरमध्ये तरंगताना दिसतोय. या व्हिडीओमुळे वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रेल्वे विभागाने घेतला मोठा निर्णय
वंदे भारत ट्रेनमधील हा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे विभागाने मोठी कारवाई केली आहे. रेल्वेने एक निवेदन सादर केले आहे. समोर आलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल, असं रेल्वे विभागाने म्हटलंय. रेल्वे विभागाने संबंधित वंदे भारत ट्रेनमध्ये जेवन पुरवणाऱ्या कंत्राटदाराला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार फुड इन्स्पेक्टरने रेल्वेतील जेवनाची चाचणी ‘दिडीहुल’ रेल्वे स्थानकावर केली होती. जेवन पॅक करण्यात आलेल्या अॅल्यूमिनिअमच्या डब्यावरील कडांवर किडा आहे. तो जेवनात मिसळलेला नाही, असं रेल्वे विभागाने म्हटलंय.
अश्विनी वैष्णव यांच्यावर प्रश्न उपस्तिथ
या प्रकरणानंतर काँग्रेसचे खासदार मनकम टागौर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव याना टॅग करून एक्स या समाजमाध्यमावर अनेक प्रश्न उपस्तिथ केले आहे. त्यांनी वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रवाशांना चांगले जेवन मिळावे यासाठी कोणती खबरदारी घेण्यात आली आहे? असा सवाल त्यांनी अश्विनी वैष्णव यांना केला आहे. या किळसवाण्या प्रकाराने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर प्रश्न उपस्तिथ होत आहे.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…