spot_img
spot_img

Latest Posts

इस्रो शास्त्रज्ञ N Valarmathi यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भारताचे चांद्रयान ३ (Chandrayaan 3) हे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचले.

भारताचे चांद्रयान ३ (Chandrayaan 3) हे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचले. भारताच्या चांद्रयान ३ यामिशनसाठी इस्रोमधील सर्वच शास्त्रज्ञानी खूप मेहनत घेतली आहे. या मोहिमेत म्हत्वाची भूमिका बजवणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञ एन. वलारमथी (N Valarmathi) यांचे वयाच्या ६४ वर्षी निधन झाले आहे. शनिवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. भारताचे चांद्रयान ३ मिशनच्या लाँचिंगवेळी काऊंडाऊन मागील आवाज हा एन. वलारमथी यांचा होता. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ हे त्यांचे शेवटचे काउंटडाउन ठरले आहे. त्यांना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एन. वलारमथी याचे निधन झाले हे ऐकून खूप वाईट वाटलं असे राजीव चंद्रशेखर म्हणाले. त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवारा प्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.

एन. वलारमथी यांचा ३सप्टेंबर २०२३ शनिवारी संध्याकाळी एका खाजगी रुग्णलयात हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले . काही काळापासून त्या अस्वस्थ होत्या. एन. वलारमथी यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे इस्रोमधील शास्त्रज्ञांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इस्रोमधील रॉकेट कॉउंटडाउनच्यावेळी एन. वलारमथी यांचा आवाज होता. त्यांनी चंद्र मोहिमेनंतर ३० जुलै रोजी रॉकेट लाँचिंगवेळी शेवटची कॉउंटडाउन घोषणा केली होती. गेल्या सहा वर्षपासून रॉकेट लाँचिंगच्या वेळी एन. वलारमथी या कॉउंटडाउनसाठी आवाज देत होत्या.

इस्रोच्या माजी संचालकांनी एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली .एन. वलारमथी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना इस्रोचे माजी संचालक डॉ. पीव्ही व्यंकटकृष्णन म्हणाले, ‘चांद्रयान-3 ही त्यांची अंतिम काऊंटडाऊन घोषणा होती. एक अनपेक्षित मृत्यू. खूप वाईट वाटतंय, प्रणाम!”

Latest Posts

Don't Miss