spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

जगातील सर्वात स्वस्त Telecom Service भारतात असल्याचा दावा

टेलिकॉम क्षेत्रात सध्या भारतात अनेक प्रयोग केले जात आहेत. ४ जी नेटवर्कच्या यशस्वी प्रयोगानंतर देशात सध्या ५ जी नेटवर्कचा प्रसार आणि ६ जी नेटवर्कच्या संशोधनाची तयारी सुरु करण्यात आली आहे. भारतात सध्या टेलिकॉम क्षेत्रात होत असलेली प्रगती भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची ठरते आहे. भारती एअरटेल (Bharati Airtel) आणि रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपली ५ जी सेवा भारताच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात नेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. गेल्या काही वर्षापासून देशात ५ जी सेवेचा विस्तार गावखेड्यात विस्तार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे वैष्णव यांनी म्हटले आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतातील दूरसंचार सेवा जगातील सर्वात स्वस्त राहावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात पुरवली जाणारी दूरसंचार सेवा इतर देशांच्या तुलनेत अधिक स्वस्त असल्याचा दावा देखील मंत्री वैष्णव यांनी केला आहे. स्वस्त दूरसंचार सेवेमुळे सर्वसामान्य जनतेला याचा उपभोग घेता येतो आहे असेही ते म्हणाले. इंडियन मोबाइल काँग्रेसचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. २७ ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान झालेल्या या कार्यक्रमात मोबाईल आणि नेटवर्क क्षेत्रात भारताच्या संधीच्या शक्यता, शासकीय योजना, सरकारी धोरणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

युपीआय व्यवहार (UPI Payments) करण्यात भारतीय नागरिक सध्या आघाडीवर आहेत. दूरसंचार क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनांचा हा परिणाम असल्याचे देखील मंत्री वैष्णव यांनी म्हटले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’ (Digital India) योजना सुरु केली आहे. याद्वारे जास्तीत जास्त मोबाईल युजर्सला डिजिटल विश्वाचा वापर करता यावा, त्यांना माहितीचे दरवाजे खुले व्हावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा : 

कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss