Kumbh Mela 2025 : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या परिसरात रविवारी (१९ जानेवारी) रोजी भीषण आग लागली. पोलिसांच्या निकषानुसार ही आग सिलिंडरच्या ब्लास्टमुळं लागल्याची माहिती त्यांनी दिली. पण ही आग खलिस्तानी जिंदाबाद या दहशदवादी संघटनेने घडवून आल्याची माहिती पुढे आली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हा महाकुंभमेळा सुरु असून या कुंभमेळ्यात दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गेल्या रविवारी म्हणजे (१९जानेवारी) कुंभमेळ्यात मोठी दुर्घटना घडली, येथील १८० छावण्यांना आग लागली या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु तंबू आणि आणि त्यात ठेवलेले सामान जाळून खाक झाले. ही आग सिलिंडरच्या ब्लास्टमुळं लागल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र आता या घटनेत खलिस्तानी दहशदवाद्यांचा हात असल्याचे समोर आले असून या आगीच्या घटनेबाबत दहशदवादी संघटना खलिस्तानी झिंदाबाद फोर्स (KZF) ने मोठा दावा केला आहे. कुंभमेळ्याच्या आगीच्या घटनेची जबाबदारी संघटनेने ई-मेल पाठवून घेतली आहे. संघटनेने असे म्हटले आहे की, हा पिलिभीत चकमकीचा बदलाआहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
खलिस्तानी झिंदाबाद फोर्सचा हा दावा पोलिसांनी फेटाळून लावला आहे. त्यावेळी पंजाबच्या विशेष डीजीपींनी सांगितले की, त्यांनी त्यावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडर्सचे एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केलं. सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरली. आगीच्या या घटनेमुळे संपूर्ण क्षेत्रात एकच घबराट, गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी अफवांकडे लक्ष देऊ नका असही म्हटलं होतं. ही आग कशी लागली? आणि इतकं विक्राळ रुप कसं धारण केलं? हे प्रशासनाने त्यावेळी स्पष्ट केलं नव्हतं. महाकुंभ क्षेत्रात टेंटमध्ये सुद्धा यात्रेकरुंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पैसे भरावे लागतात.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत