Thursday, November 30, 2023

Latest Posts

महिलांनो तुम्ही साडी घालता, पण तुम्हाला भुरळ घालणाऱ्या साडीचा इतिहास माहीत आहे?

साडी हा स्त्रियांचा आवडता पेहराव मानला जातो. शतकानुशतके भारतीय महिला साडी परिधान करीत आहे. साडी ही एक लांब कापड अंगाभोवती विशिष्ट पद्धतीने गुंडाळून नेसली जाते.

साडी हा स्त्रियांचा आवडता पेहराव मानला जातो. शतकानुशतके भारतीय महिला साडी परिधान करीत आहे. साडी ही एक लांब कापड अंगाभोवती विशिष्ट पद्धतीने गुंडाळून नेसली जाते. स्त्री ही साडीत खूप सुंदर दिसते असं म्हटलं जातं. खरं पाहायचं तर साडी हा स्त्रियांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनलाय. भारतात ७० टक्के विवाहीत महिला दररोज साडी नेसतात. याशिवाय काही सण समारंभाला विशेष साडी नेसली जाते. त्यामुळे साडीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण तुम्हाला साडीचा इतिहास माहिती आहे का?

भारतात तर साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तसेच वेगवेगळ्या राज्यात साडी नेसण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. देशातील प्रत्येक राज्यात नेसली जाणारी साडी ही त्या राज्याची संस्कृती, परंपरा आणि वारसा दर्शवते. इतिहास सांगतो की आपली हक्काची लाडकी साडी भारतात जन्मलीच नाही. हो, हे खरंय. तुमचा विश्वास बसणार नाही पण साडीचा उत्पत्ती भारतात झाली नाही. संस्कृतनुसार साडीचा शब्दश: अर्थ कपड्याची पट्टी असा होतो.

काही इतिहासकारांच्या मते कपडे शिवण्याची कला ही २८००-१८०० ई. पूर्व दरम्यान सुरू झाली आणि सोपोटामियन सभ्यताद्वारे भारतात आली. समकालीन सिंधु घाटी सभ्यता सूती कपड्यांपासून परिचित होते आणि वस्त्राच्या रुपात लंगोटसारखे कपड़े वापरायचे. पुरात्व सर्वेक्षण दरम्यान काही अवशेष, सिंध मधूनही प्राप्त झाले. १५०० ई स पूर्व नंतर जेव्हा भारतात आर्य आलेत तेव्हा पहिल्यांदा वस्त्र शब्दाचा वापर करण्यात आला. ज्याचा अर्थ त्यांच्यानुसार चामड्याचा एक तुकडा असा होता.

त्यानंतर कंबरेच्या चारही बाजूला कपड्याची लांबी असणे आणि त्यात महिलांसाठी एक नवा कपडा ओळखू लागला. त्यामुळे सिंधु घाटी सभ्यताच्या महिलांनी घातलेली लंगोट सारखा कपडा भारताच्या साडीची उत्पती होती, असं म्हणता येईल. त्यानंतर मौर्यापासून सुंगपर्यंत आणि मुगल कालपासून ब्रिटिशकाळपर्यंत सर्व साड्यांमध्ये फरक दिसून आला. मौर्य आणि सुंग काळात आयताकार साडी नुमा कपड्याचा वापर करायची जी फक्त महिलांच्या शरीराच्या खालच्या भागाला झाकायची. त्यानंतर हळूहळू साड्यांची लांबी वाढत गेली आणि मुघल काळात एक क्रांतिकारी बदल आणत शिवण कलेला प्रोत्साहन देण्यात आले आणि आजची साडी उदयास आली.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss